प्रतिनिधी पांचगणी
पाचगणी नगर परिषदेच्या एक मुखी ठरावानंतर पाचगणी पंचक्रोशीतील भीम आधारस्तंभ या संस्थेच्या माध्यमातून मुख्याधिकाऱ्यांसह नगराध्यक्ष नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.!
पाचगणी नगर नगरपरिषद हद्दीतील संविधान चौकाच्या एक मुखी ठरावानंतर पाचगणी पंचक्रोशीतील भीम आधारस्तंभ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मुख्याधिकाऱ्यांसह नगराध्यक्ष नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले, यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मोरे गुरुजी यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना सांगितले पाचगणी शहर हे सामाजिक सलोखा जपणारे शहर आहे, व त्याचे दर्शन आज प्रत्यक्षरीत्या झालेल आहे, हंम सब एक हे म्हणत पाचगणी शहराचे नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे तसेच आघाडीचे अध्यक्ष नगरसेवक शेखर कासुर्डे नगरसेवक राजश्री सनस विरोधी पक्षनेते वैभव शेठ कराडकर व इतर सर्व नगरसेवकांनी या ठरावाला एकमुखाने पाठिंबा देऊन संविधानाला आपल्या मनात रुजवले आहे, व असेच सलोखा जपणारे कार्य इथून पुढे संस्थेच्या माध्यमातून व आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून होत राहील अशी अपेक्षा बाळगतो व आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा संस्थेच्या सर्व सभासदांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्हा सर्व समाज बांधवांच्या वतीने आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि थांबतो असे प्रकाश मोरे गुरुजी म्हणाले यावेळी किसन गंगावणे नितीन वन्ने संजय वन्ने विकी परिहार नितीन कांबळे निलेश मोरे संतोष कांबळे अनमोल कांबळे विलास कदम पिंकेश सपकाळ दिलीप सपकाळ व इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

