दिनांक 23/4/2026 पासून तहसीलदार महाबळेश्वर यांच्या कार्यालयाबाहेर पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे बेमुदत धरणे आंदोलन युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे.!
April 19, 2026 | महाबळेश्वर, सातारा
प्रतिनिधी पांचगणी
दिनांक 23/4/2026 पासून तहसीलदार महाबळेश्वर यांच्या कार्यालयाबाहेर पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे बेमुदत धरणे आंदोलन युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे.
देशभर सवेदनशील ठिकाण मानले जाणाऱ्या पाचगणी महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी अनाधिकृत बांधकामांचे जाळे पसरत असून मोठ्या प्रमाणात उत्खनन व वृक्षतोडीचे प्रमाण वाढले असल्याने याचा तडाका वाढत्या गर्मीमध्ये सर्वसामान्यांना बसत असून दिवसा ढवळ्या भोसे येथील मुख्य रस्त्यालगत श्रीनाथ स्टील यांनी अनाधिकृत रित्या वृक्षतोड करत मुख्य रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात उत्खनन केले असून याची तक्रार गाव कामगार तलाठी व मंडल अधिकारी पाचगणी यांच्याकडे दाखल केली असून त्या तक्रारीकडे अक्षरशः प्रशासनाने दुर्लक्ष करत संबंधित धनदांडग्या व्यक्तीला प्रशासनामार्फत अभय देण्याचे काम सुरू केले असून वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल सुरू आहे त्याचप्रमाणे मौजे खिंगर येथील सर्वे नंबर 101 मध्ये नाशिकच्या पवार नावाच्या व्यक्तीने मोठ्या प्रमाणात उत्खनन करून बांधकाम सुरू केले आहे त्याचप्रकारे पाचगणी महाबळेश्वर मुख्य रस्त्यालगत एका व्यक्तीने विहीर खोदण्याचे काम सुरू केले आहे या संदर्भात देखील गाव कामगार तलाठी यांच्याकडे तक्रारी करून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई संबंधितांवरती होत नसल्याने प्रशासनामार्फत संबंधितांना गाव कामगार तलाठी मामीलवाड गाव कामगार तलाठी कांबळे व मंडल अधिकारी रुपेश शिंदे यांच्याकडून वृक्षतोड व अनाधिकृत बांधकाम करण्याकरिता अभय मिळत असून नक्की यातली मलाई कुणाकुणापर्यंत जात आहे याचा जाब विचारण्या करीता दिनांक 23/4/2026 रोजी पासून पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महाबळेश्वर तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर बेमुदत घंटानांद आंदोलन करणार असल्याचे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांनी सांगितले आहे.
Categories: महाबळेश्वर, सातारा
Related Posts
शिवसेना भाजपा या पक्षांसोबत पीपल्स रिपब्लिकन पार्टीची युती असल्याने PRP चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जयदीप कवाडे यांना महाराष्ट्र विधानपरिषद द्या साताऱ्यातून कार्यकर्त्यांची जोरदार मागणी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करणार अनमोल कांबळे युवक जिल्हाध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी सातारा.
April 16, 2026
प्रतिनिधी सातारा शिवसेना भाजपा या पक्षांसोबत पीपल्स रिपब्लिकन पार्टीची युती असल्याने PRP चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जयदीप कवाडे यांना महाराष्ट्र…
पाचगणी येथील पत्रकार लहू चव्हाण याच्याकडे अशी कुठली गोपनीय माहिती होती ज्या माहितीच्या आधारे पत्रकार लहू चव्हाण यांना वनसंदृष्य क्षेत्रामध्ये येणाऱ्या व लाखो रुपयांची वार्षिक उलाढाल असणाऱ्या ऐतिहासिक गुफेचा ठराव पाचगणी नगरपालिकेने करून दिला ? पाचगणी शहरासह जिल्ह्यात चर्चेला उधान.!
April 24, 2026
प्रतिनिधी अनमोल कांबळे पाचगणी येथील पत्रकार लहू चव्हाण याच्याकडे अशी कुठली गोपनीय माहिती होती ज्या माहितीच्या आधारे पत्रकार लहू चव्हाण…
