गतिमान प्रचारामुळे मतदारांची उत्सुकता वाढली नव्या कर्तुत्ववान नेतृत्वाला साथ द्या पूनम गोळे यांची मतदाराला हाक.!
January 31, 2026 | महाबळेश्वर
प्रतिनिधी पांचगणी
गतिमान प्रचारामुळे मतदारांची उत्सुकता वाढली नव्या कर्तुत्ववान नेतृत्वाला साथ द्या पूनम गोळे यांची मतदाराला हाक.
महाबळेश्वर भिलार गणातील पंचायत समिती निवडणुकीमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना सौ: पूनम निलेश गोळे यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचे दिसून आले आहे गतिमान प्रचाराची उत्सुकता मतदारांमध्ये वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे, रस्ते पाणी लाईट याच्या पलीकडे सुद्धा विकास आहे, व तो प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचला गेला पाहिजे असे पूनम गोळे यांनी सांगितले पुढे त्या म्हणाल्या विरोधी पक्षांकडून सत्तेचा वापर करत गावामध्ये प्रचार करत असताना रस्त्याची कामे सुरू आहेत याचा दाखला देत जाणीवपूर्वक निवडणुकीच्या दरम्यान रस्त्याची कामे सुरू केली असल्याचे पाहायला मिळत आहे व मतदारांपर्यंत उमेदवाराला पोचू न देण्याचे धोरण सत्ताधारी विरोधकांनी रचले असल्याचे पुनम गोळे यांनी सांगितले परंतु मी ती उमेदवार आहे जी थेट शेताच्या बांधापर्यंत व मतदाराच्या घरापर्यंत पोचल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हा विकासाचा अट्टाहास आहे आणि तो पूर्ण केल्याशिवाय इथला मतदार स्वस्त बसणार नाही हा विश्वास मला आहे, लोक जागृत झाले आहेत मला प्रचारादरम्यान कळत आहे आणि म्हणून विजय हा शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा एकनाथ शिंदे साहेबांच्या विचारांचा आणि माझ्या उमेदवारीचा होणार आहे हा आत्मविश्वास मला आहे असे भिलार गणाच्या पंचायत समितीच्या उमेदवार सौ: पूनम निलेश गोळे यांनी सांगितले.
Categories: महाबळेश्वर
Related Posts
महाबळेश्वर पंचायत समितीच्या भिलार पंचायत समिती गणा मध्ये अखेर तिरंगी लढतीवर शिक्कामोर्तब.
January 27, 2026
प्रतिनिधी महाबळेश्वर महाबळेश्वर पंचायत समितीच्या भिलार पंचायत समिती गणा मध्ये अखेर तिरंगी लढतीवर शिक्कामोर्तब. बहुचर्चित भिलार गणा मधे अखेर तिरंगी…
मला राजकीय वारस नाही व नाही आम्ही कोणाचा स्वार्थासाठी राजकीय वारसा हिरावून घेतला आहे त्यामुळे विजय हा आमचाच आहे भ्रष्टाचारातून पैसा आणि पैशातून सत्ता इतकंच नाही तर खोटे व बनावट किंग मेकर ठरणाऱ्यांला योग्य वेळी जागा दाखवू पुनम गोळे.
February 4, 2026
प्रतिनिधी पांचगणी मला राजकीय वारस नाही व नाही आम्ही कोणाचा स्वार्थासाठी राजकीय वारसा हिरावून घेतला आहे त्यामुळे विजय हा आमचाच…
