महाबळेश्वर पंचायत समितीच्या भिलार पंचायत समिती गणा मध्ये अखेर तिरंगी लढतीवर शिक्कामोर्तब.
January 27, 2026 | महाबळेश्वर
प्रतिनिधी महाबळेश्वर
महाबळेश्वर पंचायत समितीच्या भिलार पंचायत समिती गणा मध्ये अखेर तिरंगी लढतीवर शिक्कामोर्तब.
बहुचर्चित भिलार गणा मधे अखेर तिरंगी लढत शिवसेना राष्ट्रवादी भाजप अशी लढत होणार हे चित्र स्पष्ट झाले असून शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी दस्तुरखुद्द भिलार गणात मिळावी हे मतदार आणि अनेक लोकांकरिता धक्कादायक होते मात्र अनेक वर्षापासून रोजगार शिक्षण तरुण मतदार निराधार महिला यावर प्रश्नांवर काहीच उपाय योजना होताना दिसत नव्हत्या
आणि आपल्या सोयीचे गरजेनुसार नेत्यांच्या नावाचा वापर करणाऱ्यांना थेट आव्हान देत शिवसेने ने अभ्यासू धाडसी आणि प्रामाणिक कामावर विश्वास ठेवून कासवंड येथील स्वतंत्र व्यावसायिक सौ पूनम निलेश गोळे यांना उमेदवारी दिली आहे.
मात्र आता मतदार हे कोणाच्या बाजूने कौल देतात हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे मात्र जागृत मतदार , निष्ठावंत कार्यकर्ते नाराज अनेक वर्षापासून पक्षाचे प्रामाणिक काम करीत असणारे पक्षाने डावलले, तालुक्यातील बेरोजगार सुशिक्षित तरुण, मतदारांना गृहीत धरणे, वारंवार दबावतंत्र राजकारण, आणि विशेष म्हणजे तालुक्याचे भाग्यविधाते यांची निष्ठा आणि कुटुंबे एक न अनेक समाजकारण आणि राजकारणातून अगदी हुशारीने बाजूला करण्याचे यशस्वी ठरलेले डाव, शिवसेना मतदारांच्या साथीने मतदारांच्या सन्मानार्थ उधळून लावणार का याकडे सर्वांनचे लक्ष लागले आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील भूमिपुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब यांनी प्रचंड विकास जो 77 वर्षात झाला नाही तो अवघ्या 7 वर्षात केला असून संपूर्ण महाबळेश्वर तालुक्याचा झालेला कायापालट शिवाय अनेक निवडणुकांमध्ये प्रभावी ठरणारी लाडकी बहीण लाडक्या भावाला त्याच्या पक्षाला कृतार्थ भावनेने मत रूपी आशीर्वाद देणार.
मात्र 7 तारखेनंतर महाबळेश्वर तालुक्या मध्ये सक्रिय विरोधी पक्ष पाहायला मिळणार असे चित्र निर्माण झाले आहे
Categories: महाबळेश्वर
Related Posts
शिवसेनेचे मा: आमदार दगडू दादा सपकाळ यांच्या हस्ते पुनम गोळे यांचा निवडणूक वचननामा प्रसिद्ध पुनम गोळे कोयनेची लेख तिला प्रचंड बहुमताने विजयी करा माजी आमदार दगडू दादा सपकाळ.!
January 25, 2026
प्रतिनिधी महाबळेश्वर शिवसेनेचे मा: आमदार दगडू दादा सपकाळ यांच्या हस्ते पुनम गोळे यांचा निवडणूक वचननामा प्रसिद्ध पुनम गोळे कोयनेची लेख…
गतिमान प्रचारामुळे मतदारांची उत्सुकता वाढली नव्या कर्तुत्ववान नेतृत्वाला साथ द्या पूनम गोळे यांची मतदाराला हाक.!
January 31, 2026
प्रतिनिधी पांचगणी गतिमान प्रचारामुळे मतदारांची उत्सुकता वाढली नव्या कर्तुत्ववान नेतृत्वाला साथ द्या पूनम गोळे यांची मतदाराला हाक. महाबळेश्वर भिलार गणातील…
