भर पावसात विजांच्या कडकडात RTO प्रादेशिक विभागाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ पॅंथर आदित्य गायकवाडचा ‌ झंझावाती लढा सुरज आंदोलनाकडे सरकारची मात्र पाठ..!



भर पावसात विजांच्या कडकडात RTO प्रादेशिक विभागाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ पॅंथर आदित्य गायकवाडचा ‌ झंझावाती लढा सुरज आंदोलनाकडे सरकारची मात्र पाठ.

प्रतिनिधी सातारा

सातारा पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी गेल्या आठ दिवसांपासून RTO प्रादेशिक परिवहन विभागाच्या मनमानी कारभार करणाऱ्या व पंधरा वर्षांपासून एकाच जागेवरती कार्यरत असणाऱ्या दशरथ वाघुले व सुदर्शन गवळी या अधिकाऱ्यांविरोधात समानतेच्या न्यायाकरिता आंदोलनाचा लढा उभारला आहे, व संविधानिक दृष्ट्या गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन देखील सुरू केले आहे परंतु प्रशासनामार्फत RTO प्रादेशिक परिवहन विभागामार्फत सरकार कडून कुठल्याही प्रकारची सकारात्मक भूमिका आंदोलकांसोबत साधक वादक चर्चा झाली नसल्याचे समोर आले आहे, परंतु भर पावसात विजांच्या कडकडात आंदोलकांनी आपली भूमिका ठाम ठेवली असून पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड व त्यांचे सहकारी लक्ष्मण पोळ सह कार्यकर्त्यांनी विजाच्या कडकडात भर पावसात आपली आंदोलनात्मक भूमिका कायम ठेवली असल्याने सर्वत्र जिल्हाभर या आंदोलनाची चर्चा सुरू असून प्रशासनाचा मुजोरपणा पुन्हा एकदा समोर आला असल्याचे दिसून आले आहे., इतकच नाही तर भर पावसात आंदोलन सुरू असून देखील वाघोले व गवळी हे आंदोलकांचा घातपात होण्याची वाट पाहत आहेत का? अशी देखील चर्चा सर्वत्र सुरू असून आंदोलन करणाऱ्या आदित्य गायकवाड यांच्याशी चर्चा केली असता याच्या पेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन येत्या काळामध्ये या भ्रष्ट यंत्रणेविरुद्ध पुकारणार असल्याचे आदित्य गायकवाड यांनी सांगितले आहे, आदित्य गायकवाड पुढे जाऊन म्हणाले आम्ही आंबेडकरवादी विचारधारायचे कार्यकर्ते आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एक कानमंत्र सांगितला आहे लढला नाहीस तरी चालेल परंतु विकला जाऊ नकोस आणि आमची लढाई ही विकले जाणाऱ्या लोकांन विरोधातली लढाई आहे आणि आम्ही या लढाईमध्ये नक्की विजयी होऊ व येत्या काळामध्ये आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन या भ्रष्ट यंत्रणे विरोधात करू असे ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी सांगितले.