पांचगणी येथील सर्वे नंबर 128/ मधील पाकिस्तान नाव न हटवण्याकरिता  निवेरा शाळा संस्थाचालकांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये आता नव्याने अनमोल कांबळे यांच्या वतीने ॲड डॉ अन्वर हुसेन यांच्यामार्फत अंतरीम अर्ज दाखल केला असून पुढील सुनावणी करिता कोर्टाला विनंती करण्यात आली आहे.

पांचगणी येथील सर्वे नंबर 128/ मधील पाकिस्तान नाव न हटवण्याकरिता निवेरा शाळा संस्थाचालकांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये आता नव्याने अनमोल कांबळे यांच्या वतीने ॲड डॉ अन्वर हुसेन यांच्यामार्फत अंतरीम अर्ज दाखल केला असून पुढील सुनावणी करिता कोर्टाला विनंती करण्यात आली आहे.

September 11, 2024 | महाबळेश्वर

प्रतिनिधी पांचगणी

देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पाचगणी मध्ये सर्वे नंबर 128/ या जागेवरती पाकिस्तान नावाच्या सातबार्या वरती उभी असणार्या निवेरा शाळा व्यवस्थापनाने आपल्या जागेतील सातबार्या वरील पाकिस्तान नाव न हटवण्याकरिता व आपली कुठलीही चौकशी न करण्याकरिता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून यासंदर्भात शासनासह तक्रारदार अनमोल कांबळे यांना देखील या प्रकरणांमध्ये पार्टी केली गेली होती परंतु या संदर्भातली सुनावणी दिनांक 10/9/2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयात ठेवण्यात आली असता मिळालेल्या माहितीनुसार अनमोल कांबळे यांच्या वतीने ॲड डॉ अन्वर हुसेन यांनी बाजू मांडत अंतिम अर्ज मुंबई उच्च न्यायालयातील या प्रकरणामध्ये दाखल केला असून या अर्जावरील पुढील सुनावणी लवकरात लवकर घेण्याची विनंती देखील मुंबई उच्च न्यायालयाला केली आहे, ॲड डॉ अन्वर हुसेन म्हणाले की या प्रकरणांमध्ये शाळा स्थापन झाल्यापासून आज अखेर पर्यंत संस्था चालकांची चौकशी होणे गरजेचे आहे, त्याच प्रकारे शाळा डोनेशन स्वीकारत असल्यास? ते डोनेशन कुठल्या मार्गाने स्वीकारते व कशा पद्धतीने स्वीकारल जात याची देखील चौकशी होणे गरजेची आहे इतकच नाही तर आंतरराष्ट्रीय दहशतवादी विरोधी पथकाकडून देखील या संस्थाचालकांची चौकशी होणे गरजेची आहे नक्की या शाळेचा संबंध हा पाकिस्तानशी आहे का? याची संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय चित्र स्पष्ट होणार नाही शाळेचा कुठलाही संबंध नाही तर मग शाळा आपल्या सातबार्या वरील पाकिस्तान नाव न हटवण्याकरिता मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे का ठोठवत आहे हे चित्र चौकशी पूर्ण झाल्याशिवाय समोर येणार नाही आणि आम्हाला विश्वास आहे, लवकरच हे सर्व चित्र स्पष्ट होईल व जनतेसमोर सत्य येईल ‌असे अनमोल कांबळे यांच्या वतीने ॲड डॉ अन्वर हुसेन यांनी सांगितले.

Categories: महाबळेश्वर

Related Posts

पांचगणी एसटी महामंडळ बस स्टॉप येथे मुख्यमंत्र्यांच्या वतीने मंजूर केलेल्या निधीतील कामाचा दर्जा खालावला मुख्यमंत्र्यांच्या नावावरती मात्र ठेकेदार गडगंज संजय मोरे च्या हस्तकांकडून निकृष्ट दर्जाचे काम पाचगणी करांच्या माथे मात्र क्रशन ग्रिट पावडर चा मारा.

September 7, 2024

प्रतिनिधी पांचगणी पांचगणी एसटी महामंडळ बस स्टॉप येथे मुख्यमंत्र्यांच्या वतीने मंजूर केलेल्या निधीतील कामाचा दर्जा खालावला मुख्यमंत्र्यांच्या नावावरती मात्र ठेकेदार…

अखेर पांचगणीतील निवेरा शाळेला प्रशासनाचा दणका रात्री उशिरा सातबार्या वरील पाकिस्तान नाव हटवलं तक्रारदारांच्या तक्रारी सह आंदोलनाला यश

September 14, 2024

प्रतिनिधी पांचगणी अखेर पांचगणीतील निवेरा शाळेला प्रशासनाचा दणका रात्री उशिरा सातबार्या वरील पाकिस्तान नाव हटवलं तक्रारदारांच्या तक्रारी सह आंदोलनाला यश.…