अखेर पांचगणीतील निवेरा शाळेला प्रशासनाचा दणका रात्री उशिरा सातबार्या वरील पाकिस्तान नाव हटवलं तक्रारदारांच्या तक्रारी सह आंदोलनाला यश
September 14, 2024 | महाबळेश्वर
प्रतिनिधी पांचगणी
अखेर पांचगणीतील निवेरा शाळेला प्रशासनाचा दणका रात्री उशिरा सातबार्या वरील पाकिस्तान नाव हटवलं तक्रारदारांच्या तक्रारी सह आंदोलनाला यश.
मौजे पाचगणी येथील सर्वे नंबर 128/ मध्ये सातबार्या वरती 1948/ पासून देश स्वातंत्र झाल्यानंतर ही पाकिस्तानी नाव हे सातबार्या वरती ठेवण्यात निवेरा शाळा संस्था चालकांना यश आले होते इतकच नाही तर सातबार्या वरती 2019/ ला फेरबदल करण्यात आला तेव्हा देखील संस्थाचालकांनी पाकिस्तानी नाव सातबार्यावरती कायम ठेवण्यात आपली भूमिका बजावली होती व त्याला देखील संस्थाचालकांना यश आले होते परंतु 13/ ऑगस्ट 2024/रोजी ही गोष्ट अनमोल कांबळे यांच्या कानावरती पडताच ऑल इंडिया पॅंथर सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांच्यासह अनमोल कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली व सातबार्या वरील पाकिस्तानी नाव हटवण्याची मागणी करत आंदोलनाची हाक दिली व दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर पाकिस्तानी नावाचा सातबारा फाडून निवेरा शाळेतील संस्था चालकांचा निषेध करत प्रशासनाचा देखील निषेध नोंदवला व त्यानंतर महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी आपल्या कार्यालयामध्ये सुनावणी ठेवत तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले त्या म्हणण्यानुसार दिनांक 27/8/ 2024 रोजी सुनावणी पार पडली व सुनावणी मध्ये सातबार्या वरील नाव हटवण्याकरिता तहसीलदार यांनी आदेश जारी केले व त्यानंतर निवेरा शाळा संस्थाचालक यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेत सातबार्या वरील पाकिस्तान नाव न हटवण्याकरिता व कुठल्याही प्रकारची चौकशी न होण्याकरिता अर्ज दाखल केला होता, व त्या संदर्भात दिनांक 10/9/2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली होती व त्या सुनावणी दरम्यान अनमोल कांबळे यांनी आणखी एक मेहरबान न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता हा सर्व प्रकार चालू असताना दिनांक 13/9/2024/ रोजी रात्री उशिरा अखेर प्रशासनाने पाचगणी येथील सर्वे नंबर 128/ मधील सातबार्या वरील पाकिस्तानी नाव हटवत आपली भूमिका बजावल्याचे दिसून येत आहे.
Categories: महाबळेश्वर
Related Posts
पांचगणी येथील सर्वे नंबर 128/ मधील पाकिस्तान नाव न हटवण्याकरिता निवेरा शाळा संस्थाचालकांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये आता नव्याने अनमोल कांबळे यांच्या वतीने ॲड डॉ अन्वर हुसेन यांच्यामार्फत अंतरीम अर्ज दाखल केला असून पुढील सुनावणी करिता कोर्टाला विनंती करण्यात आली आहे.
September 11, 2024
प्रतिनिधी पांचगणी देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पाचगणी मध्ये सर्वे नंबर 128/ या जागेवरती पाकिस्तान नावाच्या सातबार्या वरती उभी असणार्या निवेरा…
पांचगणी येथील सर्वे नंबर 128/ मधील मिळकत धारक निवेरा शाळेच्या सातबार्या वरील पाकिस्तान नाव हटल्याने पाचगणी मध्ये पेढे वाटून आनंद उत्सव साजरा.
September 14, 2024
प्रतिनिधी पांचगणी पांचगणी येथील सर्वे नंबर 128/ मधील मिळकत धारक निवेरा शाळेच्या सातबार्या वरील पाकिस्तान नाव हटल्याने पाचगणी मध्ये पेढे…
