स्वप्नील भाई गायकवाड यांच्या नेतृत्वात निघालेला सातारा जिल्ह्यातील पहिला, लॉन्ग मार्च मंत्रालयावर धडकणार जन आक्रोश्याचा झंजावात मंत्रालयाच्या दिशेने..!



प्रतिनिधी अनमोल कांबळे

स्वप्नील भाई गायकवाड यांच्या नेतृत्वात निघालेला सातारा जिल्ह्यातील पहिला, लॉन्ग मार्च मंत्रालयावर धडकणार जन आक्रोश्याचा झंजावात मंत्रालयाच्या दिशेने.

वाई तालुक्यातील कुसगाव येथील क्रशर परवाना रद्द करण्याकरिता ग्रामस्थांचे अनेक दिवसांपासून सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शासकीय दरबारी आंदोलने व निवेदनात स्वरूपातील तक्रारींच्या येरझार्या सुरू होत्या मात्र प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल न घेता ग्रामस्थांच्या निवेदनांना केराची टोपली दाखवण्याचे काम प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले असल्याचे पाहायला मिळत असल्याने आरपीआय पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश. अध्यक्ष व वाई तालुक्याचे भूमिपुत्र युवा नेते स्वप्निल भाई गायकवाड यांनी या लढ्याला एक नवी ओळख देऊन सातारा जिल्ह्यातील व वाई तालुक्यातील वाई ते मंत्रालय असा पहिला लॉंग मार्च काढत या आंदोलनाची एक नवीन दिशादर्शक चळवळ उभी केली असल्याचे पाहायला मिळत असून आंदोलन स्थळी पत्रकारांनी भेट घेतली असता स्वप्निल गायकवाड म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘शिक्षित व्हा, संघटित व्हा, आणि संघर्ष करा हे घोषवाक्य प्रसिद्ध आहे. त्यांनी सामाजिक आणि राजकीय न्यायासाठी चळवळी उभारल्या. त्यांनी सांगितले की, “जोपर्यंत तुम्हाला सामाजिक स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत कायद्याने दिलेले कोणतेही स्वातंत्र्य तुमच्यासाठी निरुपयोगी आहे”. तोच कानमंत्र घेऊन आम्हीही अन्याया विरोधातली व मनमानी कारभाराला विरोध करणारी चळवळ उभारली आहे या चळवळीमध्ये अनेकांनी आपले योगदान दिले आहे व हीच चळवळ राज्यालाच नव्हे तर देशाला दिशा दाखवणारे भविष्यामध्ये ठरणार आहे असे आरपीआय पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष स्वप्निल गायकवाड यांनी सांगितले व आपला लढा लढण्यास ते पुढील मार्गस्थ झाले.