नागपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेला (Swabhimani Farmers Association) आता सर्वच राजकीय पक्षांचा अनुभव आलेला आहे. आमचे हात पोळून निघालेले आहेत. त्यामुळे या सर्व राजकीय पक्षांपासून अंतरावर राहायचं किंवा नाही राहायचं, याचा विचार आम्ही करतो आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) नवीन पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण सध्या महाराष्ट्राच जे सुरू आहे. त्यामुळे जनतेच्या राग तयार होतो आहे. ते दुसऱ्या पर्यायाच्या शोधात आहेत आणि असा दुसरा पर्याय देता येईल का, याबाबत आमची चर्चा सुरू आहे, असे स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) म्हणाले.

रायगड जिल्ह्यातील बेलपाडा येथे पत्रकारांशी बोलताना तुरकर म्हणाले, यापूर्वी येवढं सुडाचं राजकारण नव्हतं. राजकीय पक्षांचे वैचारिक मतभेद असू शकतात. टिका करणंही समजू शकतो. पण एखाद्या माणसाला राजकारणातून उद्धवस्त करायचं, त्याचा परिवार उद्धवस्त करायचा. ही नवीन संस्कृती रूजू होऊ पाहते आहे, ती अत्यंत वाईट आहे. येणाऱ्या पिढीसाठी, राजकारणासाठी हे अत्यंत धोकादायक आणि घातक आहे. आज जी परिस्थिती आहे, त्यामध्ये सामान माणसाने बघायचं कुणाकडे. आज त्यांना राजकीय पक्षांकडून, त्यांच्या नेत्यांकडून अपेक्षा आहेत. पण नेते असं सुडाचं राजकारण करीत असतील, तर सामान्य माणूस या राजकारणापासून कोसो दूर जाईल, यात तिळमात्रही शंका नाही. सुडाच्या राजकारणाची पद्धत बदलली पाहिजे. महाराष्ट्राचे राजकारण संस्कारधिष्टीत आहे. महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे.
नावं बदलवून त्याच त्या योजनांची घोषणा नव्याने करण्यात आली आहे. हेडलाईन मॅनेजमेंटचा हा प्रकार आहे. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या वाट्याला फार काही आले किंवा येईल, असे वाटत नाही. राज्य सरकारच्या गेल्या ५ किंवा १० वर्षांतील अर्थसंकल्पांचं ऑडिट केलं तर केलेल्या घोषणा आणि अंमलबजावणी यामध्ये जमीन अस्मानचं अंतर आहे. सभागृहात केलेल्या घोषणा तिथपर्यंतच राहतात. सामान्य माणसाला त्याचा फार काही लाभ होत नाही. हजारो शेतकरी दर महिन्याला आत्महत्या करतात, त्याबद्दल काहीच चर्चा नाही. सामान्य माणसांचे जगणं कसं सुसह्य होईल, यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद केलेली नाही, असा आरोप तुपकर यांनी केला.महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांची चिंतन करण्याची वेळ आली आहे. अन्यथा पंजाबमध्ये जनतेने जसा आम आदमी पार्टीचा पर्याय सामान्य लोकांनी निवडला, तसा महाराष्ट्रातील जनता येत्या निवडणुकीत निवडेल. त्यामुळे राजकीय पक्षांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांची भांडणं पाहून जनतेला कंटाळा आलेला आहे. यांच्या भांडणांमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न बाजुला राहिलेले आहेत. ग्रामीणा भाग उद्धवस्त झाला. कोरोनानंतर शेतकरी, व्यापारी उद्धवस्त झाले. सत्तेतून पैसा आणि पैशांतून सत्ता, या प्रकारमुळेच राजकारणाचा स्तर खालावला असल्याची टिका रविकांत तुपकर यांनी केली.

