निर्धार एकच आमदार मकरंद आबा पाटील फिक्सच पाचगणीतील माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे यांची मतदारांना भावनिक हाक
प्रतिनिधी अनमोल कांबळे
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 / च्या अनुषंगाने आमदार मकरंद आबा पाटील यांना भरघोस मतांनी पाचगणी शहरातून मताधिक्य देण्याचा निर्धार पाचगणी शहरातील तमाम मतदारांनी केला असल्याने वाई खंडाळा महाबळेश्वर मध्ये पुन्हा मकरंद आबा पाटील यांच्या विकास कामाचा झंजावात पाहायला मिळणार असल्याचे पाचगणी शहराचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाचगणी शहराचे झुंजार नेते शेखर कासुर्डे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले कासुर्डे म्हणाले पाचगणीतील पर्यटन क्षेत्राविषयी आमदारांनी वेळोवेळी पर्यटन स्थळांचे सुशोभीकरण करण्याकरिता मदत केलेली आहे, पाचगणी महाबळेश्वरचे पर्यटन कसे वाढेल याकडे आबांचा नेहमीच ओघ राहिलेला आहे, टेबल लँड ते पाचगणीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पर्यंत रस्त्यावरती येणाऱ्या पावसाळी पाण्याचे नियोजन आबांनी केले गटरे बांधली रस्त्याचे सुशोभीकरण केले टेबल लँड वरील पार्किंग व्यवस्थे करिता निधी उपलब्ध केला त्याचे देखील काम युद्ध पातळीवरती चालू आहे, गोरगरीब व्यापाऱ्यांना नगरपालिकेमार्फत निधी उपलब्ध करून गाळे बांधून देण्याचे काम आबांच्या माध्यमातून चालू आहे सिडनी पॉइंट वरील पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटन वाढीसाठी नियोजन हे आम्हाला विचारात घेऊन युद्ध पातळीवरती आबांनी केले पर्यटनाच्या दृष्टिकोनातून स्थानिकांना रोजगार कसा उपलब्ध होईल याचे धोरण आम्हा स्थानिकांना विचारांमध्ये घेऊन आबांनी आखले त्याचा फायदा इथल्या प्रस्थापित गोरगरीब छोट छोट्या व्यापाऱ्यांना झाला हे पाचगणीतील तमाम छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांन सहित शहरातील मतदारांनी विसरता कामा नये आमदार मकरंद आबा पाटील हे विकासाचं नाव नसून विकासाचे धोरण आहे, या धोरणाला साथ द्या विकासाला हात द्या आणि आबांच्या पाठीमागे मतदानाच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या ताकतीने उभे राहा आबांना मत म्हणजेच विकासाला मत अशी भावनिक हाक पाचगणी शहराचे माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे यांनी आपल्या वैचारिक दृष्टिकोनातून मतदारांना घातल्याची दिसून येत आहे.

