मतदार संघात केलेल्या विकास कामांमुळेच आबांचा विजय निश्चित युवा नेते राजेंद्र शेठ राजपुरे..!!



मतदारसंघात केलेल्या विकास कामांमुळेच आबांचा विजय निश्चित युवा नेते राजेंद्र शेठ राजपुरे..!!

प्रतिनिधी अनमोल कांबळे

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावताच नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला चालू झाल्या आहेत त्यातच आता वाई खंडाळा महाबळेश्वर चे युवा नेते राजेंद्र शेठ राजपुरे म्हणाले वाई खंडाळा महाबळेश्वर हा आमदार मकरंद आबा पाटील यांनी विकास कामाच्या माध्यमातून उजळवलेला मतदारसंघ आहे, वाई खंडाळा महाबळेश्वर या मतदारसंघांमध्ये आबांनी विविध विकास कामे केली आहेत व ती आम्ही जनतेसमोर मांडली आहेत आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे या मतदारसंघांमध्ये पुन्हा एकदा मकरंद आबा पाटील यांचा विजय होणार आहे, कारण आबांच्या माध्यमातून झालेला मतदारसंघाचा विकास सामान्य जनता कधी विसरली नाही व कधी विसरणारही नाही या विकासाच्या जोरावरती आम्ही जनतेसमोर गेलो आहोत व आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद जनतेने दिलेला आहे, महाबळेश्वर तालुक्यातील जनतेने तर आबांना निवडून आणायची शपथ घेतली आहे, आता जनतेने ठरवलं आहे विकास जोमात विरोधक कोमात पूर्ण ताकतीने आम्ही वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील विकासाची धुरा घेऊन जनतेसमोर गेलो आहोत व आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे, महाबळेश्वर तालुक्याची जनता आमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही कांदाटी खोर्यापासून नीरा नदीच्या टोकापर्यंत केलेल्या विकासाच्या जोरावरती जनता भरभरून मतदानाच्या माध्यमातून आबांना आशीर्वाद देईल व आबांचा विजय निश्चित होईल, गटतट जातभेत न मानणाऱ्या नेत्याला मतदान करा आणि तुमचा हक्काचा माणूस विधानसभेत पाठवा असे आव्हान वाई खंडाळा महाबळेश्वरचे युवा नेते राजेंद्र शेठ राजपुरे यांनी केले आहे.