प्रतिनिधी पांचगणी अनमोल कांबळे
पांचगणी मध्ये प्रकाश गोळे यांच्या पुढाकाराने पांचगणी शहरात घड्याळाचा झंजावात मकरंद आबा पाटलांच मतदानाच पार्ड जड होण्याचे चित्र
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती मकरंद आबा पाटलांना पांचगणीतील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गोळे यांची साथ मिळाल्याने याचा फायदा विद्यमान आमदार मकरंद आबा पाटलांना होणार असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे, प्रकाश गोळे हे तळागळातील लोकांमध्ये सक्रिय असल्याने सिद्धार्थ नगर शाहूनगर कॉलनी जुना पावर हाऊस वाल्मिकी नगर तसेच शहरातील मुख्य लोकवस्त्यांन वरती प्रकाश गोळे यांचे वर्चस्व असल्याने तळागळातील असणारा सर्वसामान्य माणूस प्रकाश गोळे यांच्या स्वभावामुळे त्यांच्या सोबत असल्याने प्रकाश गोळे हे (आमदार) मकरंद आबा पाटील यांचा अहोरात्र प्रचार गल्ली बोळात करत असल्याने याचा थेट फायदा मकरंद आबा पाटील यांना होणार असल्याचे दिसून येत आहे, ज्या गल्लीमध्ये घड्याळ माहित नव्हतं त्या गल्लीमध्ये घड्याळाचे झेंडे लागले असल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती प्रकाश गोळे यांनी मकरंद आबा पाटलांसाठी अशी कुठली छडी फिरवली की लोकांच्या घरावरती व गल्याण मध्ये मकरंद आबा पाटलांचे बॅनर दिसायला लागले आहेत, प्रकाश गोळे यांनी मकरंद आबा पाटलांचा प्रचार सुरू केल्यामुळे मकरंद आबा पाटील यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात वाड्या वस्त्यांमध्ये ताकद मिळाली असल्याचे दिसून येत असून याचा सर्वस्व फायदा हा मकरंद आबा पाटील यांना मतदानाच्या माध्यमातून मिळणार असल्याचे दिसून येत आहे

