मौजे अनवडी येथील संयुक्त बौद्ध पौर्णिमा जयंती महोत्सव उत्साहात साजरा.
प्रतिनिधी वाई
मौजे अनवडी येथील संयुक्त बौद्ध पौर्णिमा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी गावातील चिमुकले व बालकलाकार सामील झाले असल्याचे दिसून आले अनवडी गावच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महिलांना लेझीम खेळण्यासाठी कल्पना सुचवली यावेळी गावातील मंगल महादू मोरे यांचे प्रथम अभिनंदन ज्येष्ठ महिला संगीता राजेंद्र मोरे, विद्या भाऊसाहेब मोरे, मंगल महादू मोरे, मनीषा दयानंद मोरे,शारदा संदीप मोरे व नवीन मुली प्रज्ञा राजगुरू, नीलम मोरे, कोमल मोरे, राणी,स्विटी दादा मोरे तसेच लहान मुली यांनी अप्रतिम प्रकारे लेझीम खेळली त्या खेळाला गावातील भास्कर मोरे यांच्याकडून बक्षीस देण्यात आले तसेच मंडळाचे अध्यक्ष व सर्व कार्यकर्ते यांनी व्यवस्थित कार्यक्रम पार पाडला त्यानंतर या कार्यक्रमात वेगवेगळ्या रेसिपी किंवा खेळामध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंचे गावातील जेष्ठ मंडळींकडून अभिनंदन करण्यात आले व प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक तसेच तृतीय क्रमांक आलेल्या सर्व खेळाडूंना बक्षीस वितरण करून देण्यात आले तसेच गावचे सरपंच गौतम केरबा मोरे व सोसायटी सदस्य भास्कर आनंदा मोरे. हनुमंत कोंडीबा मोरे. भीमराव मोरे. नागेश मोरे. तसेच बौद्धाचार्य अनिल मोरे व महादू मोरे यांनी खेळाडूंना लेझीम खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध व सर्व महापुरुष यांची संयुक्त जयंती जोशीविहिरी चौक ते अनवडी बौद्धवस्ती या ठिकाणी व्यवस्थित रित्या पार पडली असल्याचे दिसून आले.

