राज्यभर गाजलेल्या अत्याचार प्रकरणात सतीश पवार यांचा कलम 376 मधील जामीन रद्द करण्याकरिता ॲड विकास पाटील शिरगावकर यांचा वाई न्यायालयात परखड युक्तिवाद.
प्रतिनिधी वाई
राज्यभर गाजलेल्या पाचगणी पोलीस ठाण्याचे निलंबित पोलीस निरीक्षक सतीश पवार यांना मेहरबान न्यायालयाने बलात्कार प्रकरणात पीडितेच्या अर्जानंतर जामीन मंजूर केल्या नंतर आता अशा गोष्टी बाहेर येऊ लागल्या आहेत की सदर जामीन मंजूर होत असताना आरोपीने पीडीतेला धमकवत जामीन देण्यास आपली कुठलीही हरकत नाही असे जबरदस्तीने सहमती पत्र लिहून घेतले असा परखड आरोप पीडीतेचे वकील ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी आज न्यायालयामध्ये केला ॲड शिरगावकर पुढे जाऊन म्हणाले की सदर पीडित महिलेवरती तिच्या गावी जाऊन केस मागे घे यासाठी आरोपीने दबाव आणला सदर प्रकरणी पीडित महिलाही सुपा पोलीस स्टेशन येथे आरोपीच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यास गेली असता पिढीत महिलेची तक्रार कुठल्याही प्रकारे पोलिसांनी दाखल करून घेण्यास नकार दिला मेहरबान न्यायालयाने सदर आरोपीला फेब्रुवारीपासून हजेरी लावण्यात सांगितले असता हजेरी पुस्तकावरती खाडाखोड करत आरोपी गैरहजर असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी आणून दिले तसेच समज बुजवून देखील न्यायालयात हजर होणे हे एक पावलीस अधिकाऱ्याने करणे चुकीचे व अटकपूर्व जामीन मंजूर आदेशाचे व अटीचे पालन न करणे हे न्यायालयाच्या आदेशाचे आवमान करण्याचा प्रकार असून न्यायालयाने तो मुद्दा विचारात घ्यावा व अटक पूर्वक जामीन आदेश आरोपीचा तात्काळ रद्द करावा असा जोरदार युक्तिवाद पीडीतेच्या वतीने ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी आज वाई न्यायालयामध्ये केला असल्याने ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आम्ही आज न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे की कशाप्रकारे आरोपीने आपल्या पदाचा व सहकाऱ्यांच्या वतीने न्यायालयीन आदेशाचा गैरफायदा घेत न्यायालयाने मंजूर केलेल्या जामीनाचा गैरफायदा घेत न्यायालयीन आदेशाचा आव्हान केलेला आहे, व आम्हाला न्यायालयावरती पूर्ण विश्वास आहे आरोपीने जबरदस्तीने पीडीतेला धमकवून मंजूर करून घेतलेला जामीन हा लवकरच रद्द होईल असे ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

