मौजे वनगळ ता: सातारा येथील मुख्यमार्ग प्रवेश द्वारापासून दुरदशित खड्डे मे रस्ता तात्काळ दुरुस्त करा अन्यथा आंदोलन करू रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांचा प्रशासनाला इशारा



सातारा प्रतिनिधी

मौजे वनगळ ता: सातारा येथील मुख्यमार्ग प्रवेश द्वारापासून दुरदशित खड्डे मे रस्ता झाला असून या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचे व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे गावकऱ्यांनी अनेक तक्रारी केल्या परंतु प्रशासनाचा या तक्रारींकडे अक्षरशा कानाडोळा होत असून रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांनी या विषयाची संपूर्ण माहिती जिल्हा प्रशासनाला दिली असून तात्काळ वनगळ या रस्त्याचे डांबरीकरण हे झाले पाहिजे जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्या व बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळेच ऐन पावसाळ्यामध्ये रस्त्याची ही अवस्था होत आहे लोकांना रस्ते मिळत नाहीत मात्र ठेकेदारांना बिल तात्काळ अदा केले जातात म्हणून रस्त्याचे काम योग्य दर्जाचे होत नाही आणि म्हणून असे असताना प्रथमतः त्या ठेकेदारा कडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे तो तयार करत असणाऱ्या रस्त्यावरील डांबर हे योग्य आहे की नाही याची माहिती ही प्रशासनाकडे असणे गरजेची आहे व ती माहिती इथून पुढे प्रशासन ठेवेल अशी आम्ही आशा बाळगतो आणि तात्काळ या रस्त्याचे काम चालू होईल अशी आम्ही जिल्हाधिकारी यांना विनंती केली आहे व रस्त्याचे काम तात्काळ चालू न झाल्यास सर्व कार्यकर्ते घेऊन रस्ता पूजनाचा कार्यक्रम हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असे रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांनी सांगितले.