प्रतिनिधी
किरण अडसूळ
सातारा जिल्ह्यात किती तरी तालुके विकासापासून वंचित राहिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे इतकंच काय तर खासदार या तालुक्यांकडे पाहत ही नव्हते किंबहुना काही तालुक्यात तर फिरकत सुद्धा नव्हते तर विकास करणे लांबची गोष्ट मग मात्र बावधन हुमगाव चा जोड रस्ता असेल किंवा बोरगाव भोसे हा रोड असेल दोन तालुक्यांना जोडणारे कितीक रस्ते प्रलंबित आहेत धरणांची कामे अपुरी असताना त्या ठिकाणची लोक शेत पाण्यासाठी वंचित असलेल्याचे चित्र पाहायला मिळते शशिकांत शिंदे यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिळालेली
उमेदवारी म्हणजे संपूर्ण जिल्ह्याला मिळालेले पुनर्जीवन म्हणावे लागेल या उमेदवारीने जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराला आशेचा नवा किरण दिसत आहे शरद पवार साहेब नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे राजकारण करताना आजपर्यंत दिसले आहेत म्हणूनच कदाचित ही उमेदवारी म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांचा विजय होय
जिल्ह्यात बेरोजगार प्रचंड प्रमाणात रोजगारापासून वंचित आहेत मान खटाव चे चित्र फार विदारक आहे गेली कित्येक वर्ष हे तालुके विकासापासून दुरावलेल्या अवस्थेत त्या ठिकाणी आहेत तेथील लोक आपला उदरनिर्वाह पारंपारिक पद्धतीने करत आहेत हे चित्र पलटणार असे नेतृत्व जिल्ह्याला हवे होते मात्र शशिकांत शिंदे यांच्या रूपाने ते उदयास येईल असे चित्र पाहायला मिळत आहे.,

