सातारा जिल्ह्यातील मनमानी कारभाराला विरोध करत शासन निर्णय अमलात आणणारे सातारा जिल्ह्याचे धाडसी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची सातारा जिल्ह्यातून तडकाफडकी बदली बदलीमुळे सातारकर तीव्र नाराज,….



प्रतिनिधी
अनमोल कांबळे

आपल्या कठोर निर्णयांनी सातारा जिल्ह्याला हाद्रवून सोडणारे सातारा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची अचानक सातारा जिल्ह्यातून तडकाफडकी बदली झाली असल्याने सातारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या विषयांना उत आले आहे रुचेश जयवंशी यांनी आपल्या कार्यकाळात सातारा जिल्ह्यातील लोकांच्याहितार्थ अनेक कठोर निर्णय घेतले होते याच निर्णयांचा वचपा म्हणून की काय,? कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची सातारा जिल्ह्यातून अचानकपणे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे, रुचेश जयवंशी यांचा कार्यकाळ नेहमी सातारकरांच्या स्मरणात राहील सातारकर त्यांच्या कार्याला कधीही विसरणार नाहीत, सातारा जिल्ह्याला भरपूर जिल्हाधिकारी लाभले काही जिल्हाधिकाऱ्यांना डाइन म्हणून संबोधित केले गेले तर काहींना महसुलातल्या गेंडाची कातडी म्हणून संबोधित केले गेले,‌ परंतु मागील कार्यकाळ पाहता पिंपरी चिंचवडचे सध्याचे आयुक्त आणि सातारा जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंग आणि आत्ताचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सातारा जिल्ह्याकरिता घेतलेले कठोर निर्णय हे कायम सातारकरांच्या स्मरणात राहतील अशा भावना आता सातारा जिल्ह्यातील लोकांमधून उमठू लागल्या आहेत…