प्रतिनिधी सातारा
(ॲड) महमूद प्राचा (ॲड) (डॉ) अन्वर हुसेन यांनी एस सी एस टी ओ बी सी सहित वव्फ बोर्डासाठी केंद्रातील उभारलेल्या लढ्याला देशातून पाठिंबा मिळत असताना आत्ता साताऱ्यातून आदित्य गायकवाड यांचा पाठिंबा जाहीर.
जगप्रसिद्ध वकील (ॲड) मेहमूद जी प्राचा यांनी देशात एस सी एस टी ओ बी सी समाजाचे प्रतिनिधित्व करत वंचित समाजाच्या घटकांना त्यांच्या न्याय हक्कासाठी भक्कम करण्याचे धोरण हातामध्ये घेतले आहे त्याच प्रकारे वव्फ बोर्डाच्या जागा वव्फ बोर्डाच्या ताब्यातच राहण्याकरिता संविधानिक कायदेशीर लढाई सुरू केली आहे, व ही लढाई लढत असताना सुप्रीम कोर्ट चे वकील (ॲड) (डॉ) अन्वर हुसेन यांची देखील साथ मौल्यवान ठरली असल्याचे दिसून येत आहे, या क्रांतिकारक लढ्याला देशातून व राज्यातून विविध संघटनांच्या माध्यमातून पाठिंबा मिळत असताना ऑल इंडिया पॅंथर सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी देखील आपला व आपल्या समाजाचा पाठिंबा जाहीर करत (ॲड) (डॉ) अन्वर हुसेन यांच्याकडे पत्र सुपूर्त केले आहे पत्रामध्ये म्हटले आहे की माझ्यासोबत असणारे सर्व कार्यकर्ते समाजबांधव हे आपल्या या एस सी एस टी ओबीसी वंचित समाजासाठी व वव्फ बोर्डासाठी संविधानांच्या नियमानुसार नेतृत्व करणारे (ॲड) महमूद जी प्राचा सर व (ॲड) (डॉ) अन्वर हुसेन यांच्यासोबत आम्ही सर्वजण आहोत या देशात क्रांती ही आंदोलने मोर्चे काढून होणार नाही तर संविधानाच्या मार्गाने होणार आहे, कोर्टाच्या दृष्टिकोनातून होणार आहे, आणि म्हणून आम्ही या संविधानिक क्रांतिकारी लढ्यामध्ये आपल्या सोबत आहोत, अशा आशयाचे पत्र ऑल इंडिया पॅंथर सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी (ॲड) (डॉ) अन्वर हुसेन यांच्याकडे सुपूर्त केले आहे.

