प्रतिनिधी सातारा
साताऱ्यात बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात रस्त्यावरती पडलेल्या खड्यांमध्ये ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांच्याकडून अनोख्या पद्धतीत गोट्या खेळो आंदोलन.
सातारा येथील यशवंतराव चव्हाण कॉलेजच्या समोरील रोड वरती सर्वात मोठ्या पडलेल्या बघदाड खड्या मुळे यशवंतराव चव्हाण कॉलेज मुख्य रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या वृद्ध महिला मुली मुले शिक्षक यांना वारंवार खड्याच्या समस्यांमुळे गाड्यांचे एक्सीडेंट होणे व एक्सीडेंट च्या माध्यमातून शरीराला इजा होणे असे प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होते वारंवार या संदर्भात बांधकाम विभाग यांच्याकडे तक्रारी करून देखील बांधकाम विभागाकडून जाणीवपूर्वक या खड्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर येत होते परंतु ऑल इंडिया पॅंथर सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी या विषयासंदर्भात बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता अधिकाऱ्यांनी चार दिवसांमध्ये खड्डा दुरुस्त करतो असे आश्वासन दिले मात्र त्या आश्वासनावरती कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचे चित्र दिसून येत होते त्या अनुषंगाने ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी सातारा येथे यशवंतराव चव्हाण कॉलेज समोरील खड्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांना घेऊन अनोख्या पद्धतीचे गोट्या खेळो आंदोलन आज रोजी केले असल्याचे पाहायला मिळाले व या आंदोलनाला सातारा शहरवासीयांचा चांगल्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याची चित्र देखील या आंदोलनावेळी पाहायला मिळाले आंदोलनावेळी आदित्य गायकवाड म्हणले की येत्या आठ दिवसांमध्ये जर का हा खड्डा पूर्णपणे मुजवला नाही तर बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये विटी दांडूक हे आंदोलन आम्ही करणार आहोत याची दक्षता प्रशासनाने घ्यावी कारण विटी दांडूक आंदोलनापेक्षा लोकांचे प्राण आम्हाला महत्त्वाचे आहेत हे इथल्या प्रस्थापित प्रशासनाने लक्षात घ्यावे शासन यंत्रणा ही लोकांसाठी आहे, लोक शासन यंत्रणेसाठी नाहीत हेही प्रशासनामध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांनी समजून घ्यावे व त्या पद्धतीत लोकांना समजून घेत न्याय देण्याचा प्रयत्न करावा कारण हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानानुसार चालतो हेही संबंधित अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे असे ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी सांगितले यावेळी सातारा जिल्हा महासचिव आशिष मोरे अनमोल कांबळे सातारा शहराध्यक्ष सुशांत वायदंडे जावली तालुका अध्यक्ष आनंदा कांबळे व इतर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते.

