प्रतिनिधी सातारा
सातारा येथे हूलडखोर तरुणांकडून मिरवणुकीमध्ये अश्लील चाळे वाढले ऑल इंडिया पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांची सातारा शहर पोलिसांकडे कारवाईची मागणी
सातारा येथील 16/9/ 2024 रोजी गणपती मिरवणुकीमध्ये नेत्यांचे फोटो खांद्यावरती घेऊन नशेमध्ये गुंग असणाऱ्या तरुणांनी ट्रॅक्टर वरती चडून महिलांकडे व मुलींकडे पाहून अश्लील चाळे केल्याचे समोर येताच ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी थेट आज दिनांक 17/9/2024 रोजी या अशा हूल्लडखोर तरुणांवरती कारवाई करण्याकरिता सातारा शहर पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे या निवेदनात म्हटले आहे की सातारा येथील काल निघालेल्या मिरवणुकीमध्ये काही हुल्लडखोर तरुणांनी नशे मध्ये गुंग होऊन महिला व मुली गणपती मिरवणूक पाहण्याकरिता साईटला उभे राहत असतात व याचाच गैरफायदा घेत या तरुणांनी जाणीवपूर्वक महिलांवरती व मुलींवरती गुलाल फेकणे त्याच प्रकारे रस्त्यावरती आपल्या पोटाची खळगी भरण्याकरिता छोटे छोटे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांकडून फुगे घेणे लुटमार करणे गरीब लोकांना मारहाण करणे असे प्रकार काल सातारा येथील मिरवणुकीमध्ये समोर आले असल्याचे दिसून येत आहे व याच विषयाच्या अनुषंगाने आज रोजी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी सातारा शहर पोलीस ठाणे तसेच पोलीस अधीक्षक सातारा यांना निवेदन दिले आहे, व या निवेदनात म्हटले आहे की तात्काळ अशा हूल्लडखोर तरुणांवरती कारवाई करा गणपती मिरवणुकीमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवा व गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या होणारे विनयभंग व छेडछाड थांबवा असे निवेदनात म्हटले असून आज रोजी हे निवेदन सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक यांच्याकडे सोपवण्यात आले असल्याचे समजते.

