मी ज्या समाजात जन्माला आलो तो समाज मला विज्ञान आणि ज्ञान शिकवतो आणि माझं कर्तव्य आहे मला मिळालेले ज्ञान मी लोकांना द्यावे हेच खरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त त्यांना माझ्याकडून खरे अभिवादन असेल ACP संजय कांबळे मुंबई पोलीस 14 एप्रिल रोजी भिलार गावामध्ये 200 हून अधिक ‌पुस्तके वाटप करणार..!



मी ज्या समाजात जन्माला आलो तो समाज मला विज्ञान आणि ज्ञान शिकवतो आणि माझं कर्तव्य आहे मला मिळालेले ज्ञान मी लोकांना द्यावे हेच खरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त त्यांना माझ्याकडून खरे अभिवादन असेल ACP संजय कांबळे मुंबई पोलीस 14 एप्रिल रोजी भिलार गावामध्ये 200 हून अधिक ‌पुस्तके वाटप करणार.,

प्रतिनिधी अनमोल कांबळे

महाबळेश्वर तालुक्यामध्ये पुस्तकाच्या गावाचा दर्जा मिळालेल्या मौजे भिलार येथील भिलार गावचे भूमिपुत्र असणारे व मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे माजी पोलीस अधिकारी संजय कांबळे यांच्याकडून १४ एप्रिल 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त संजय कांबळे हे 200 पुस्तके वाटप करणार आहेत व त्याचे पूर्ण नियोजन भिलार येथे आखले असल्याचे देखील भिलार गावचे पोलीस पाटील यांच्यासह मंडळाचे सदस्य संतोष कांबळे यांनी सांगितले आहे, या कार्यक्रमाच्या नियोजना संदर्भात संजय कांबळे यांच्याशी बातचीत केले असता संजय कांबळे म्हणाले मी ज्या समाजामध्ये जन्मलो तो समाज मला न्याय संघर्ष अधिकार एकमता एक विचार शिकवतो आणि हा विचार प्रत्येकाच्या विचारांमध्ये रवला गेला पाहिजे म्हणून ही ज्ञानाची प्रतिज्ञा पुस्तकांच्या रूपाने आम्ही 200 हून अधिक लोकांना अर्पण करणार आहोत व याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त महामानवाला अभिवादन करणार आहोत व आमच्या सर्वांकडून हेच ज्ञानाचे खरे अभिवादन महामानवाला असेल असे भिलार गावचे सुपुत्र संजय कांबळे यांनी सांगितले.