सातारा प्रतिनिधी
रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांनी सातारा जिल्हा अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यापासून रिपब्लिकन सेनेला सातारा जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रमाणात यश प्राप्ती झाल्याचे चित्र दिसून येत आहे व संघटना सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील कुषीमध्ये वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे हे निळे वादळ पसरत असतानाच आता वंचित बहुजन आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे माजी जिल्हाध्यक्ष यांनी विशाल भोसले यांचे नेतृत्व मान्य करून नुकताच रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केला असून रिपब्लिकन सेना ही सातारा जिल्हा तसेच वाई तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढवण्याचे चित्र दिसून येत आहे व वाई तालुका अध्यक्ष मयूर गायकवाड यांची देखील तालुका अध्यक्षपदी निवड करून विशाल भोसले यांनी वाई तालुक्याला युवकांकरिता एक भक्कम नेतृत्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे व हे नेतृत्व नक्कीच शोषितांकरिता पिढीतांन करिता त्यांचा आवाज म्हणून त्यांना न्याय मिळवून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल असा आत्मविश्वास रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांनी दाखवला आहे व त्याचबरोबर फलटण कोरेगाव पाटण महाबळेश्वर कराड या ठिकाणी देखील कार्यकर्त्यांची फळी आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न येत्या काळात होणार असून याचे प्रत्युत्तर हे लोकांच्या न्याय हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालया वरती आंदोलनाच्या माध्यमातून लवकरच दिसून येईल असे रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांनी सांगितले त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील दलितांचा आवाज मानले जाणारे दलित नेते व रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष किरण अडसूळ हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते गाव तिथे शाखा हे ध्येय बाळगून आम्ही घरातून बाहेर पडलो आहोत लोकांच्या न्याय हक्कासाठी वेळ पडली तर स्वतःला पेटवून घेऊ परंतु त्या पिढीताला न्याय देऊ असे पत्रकारांशी बोलताना किरण अडसूळ यांनी सांगितले.

