प्रतिनिधी अनमोल कांबळे
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे प्रणित मोरे आक्रमक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोटो काढून वाई खंडाळा महाबळेश्वर परिसरातील कामगार वर्गाची फसवणूक करणाऱ्या वासुदेव शर्मा व त्याचा हस्तक जयवंत मोरे यांच्यावरती तात्काळ फसवणुकीचे गुन्हे दाखल करा..
मा: नरेंद्र मोदी विचार मंचाचा मी देशाचा उपाध्यक्ष आहे असे सांगत वाई खंडाळा महाबळेश्वर मध्ये लोकांची व कामगार वर्गाची फसवणूक करणाऱ्या वासुदेव शर्मा व त्याचा हस्तक जयवंत मोरे यांच्या विरोधात महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष आक्रमक भूमिकेत असल्याचे दिसून आले आहे वाई खंडाळा महाबळेश्वर संघटक प्रणित मोरे हे आता चांगलेच आक्रमक झाले असून प्रणित मोरे यांनी प्रशासनाला सवाल केला आहे, प्रणित मोरे म्हणाले वाई महाबळेश्वर खंडाळा हा गोरगरीब जनतेचा मतदार संघ आहे इथं कष्ट करायला स्वाभिमान आहे, गरजूला आदाराची अपेक्षा आहे, आणि याचाच फायदा घेत मा: नरेंद्र मोदी विचार मंचाच्या नावाखाली काही बिहारी बाबांनी वाई पाचगणी महाबळेश्वर या ठिकाणी लक्ष केंद्रित केले आहे येथील गोरगरीब जनतेची फसवणूक सुरू केली आहे, हे आम्ही कदापि सहन करणार नाही शेवटी आम्ही व आमचा पक्ष या सरकार मधला महत्त्वपूर्ण भाग आहोत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा: संजय भैय्या सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मा: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना कार्यकर्त्यांच्या मदतीने भरघोस मतदान संजय भैय्या सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने दिलेले आहे, शेवटी आम्ही या युतीमध्ये शामिल आहोत परंतु वासुदेव शर्मा नावाचा व्यक्ती हा पुण्याहून येऊन माझा मुलगा वकील आहे व मी नरेंद्र मोदी विचार मंचाचा देशाचा उपाध्यक्ष आहे असे सांगत लोकांची फसवणूक करत आहे पोलीस अधीक्षक पोलीस महासंचालक यांना भेटून व यांच्यासोबत फोटो काढून हे लोक माझ्या थेट टच मध्ये आहेत मी तुमची कामे एका मिनिटात फोन वरती करू शकतो परंतु मला भेटायला पुण्याच्या ऑफिसला या असे सांगून लोकांची फसवणूक या वासुदेव शर्मा व त्याचा हस्तक असणाऱ्या जयवंत मोरे यांनी सुरू केली असल्याचे दिसून आले आहे इतकेच नाही तर वाई परिसरामध्ये अनेक कामगारांना नोकरी देतो काम लावतो असे सांगून फसवणूक देखील या जयवंत मोरे व वासुदेव शर्मा यांनी केली असून अनेक लोकांच्या तक्रारी आता महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाकडे प्राप्त होत असल्याने पोलीस प्रशासनाने यासंदर्भात कारवाई करून संबंधितांच्या मुसक्या न आवळल्यास लवकरच या दोघांविरुद्ध जन आंदोलन उभारण्याची वेळ आली असल्याचे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे वाई खंडाळा महाबळेश्वर संघटक प्रणित मोरे यांनी सांगितले आहे..

