प्रतिनिधी
अनमोल कांबळे
दिनांक 7/10/23/ रोजी सातारा येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची नुकतीच सातारा येथे पुसेसावळी येथे उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमी वरती देशासह राज्यांमध्ये जिल्हा जिल्ह्यामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद सातारकरांनी दिला अनेक मान्यवरांची भाषणे पार पडली भाषणे पार पडत असताना प्रामुख्याने पुसेसावळी येथे उसळलेल्या दंगलीचा विषय हा प्रामुख्याने चर्चेचा विषय ठरला देशातले वातावरण हे फार गढूळ झालेले आहे देशांमध्ये हिटलरशाही सुरू झालेली दिसत आहे हिटलर जर का कुणाला भीत होता तर तो एकतेला भीत होता आणि आपल्यातली एकता ही कायम राहिली पाहिजे नाहीतर हिटलर ज्याप्रकारे एकट्या एकट्याला गाठायचा अशी परिस्थिती उद्भवू शकते म्हणून आपण संघटित होणे फार गरजेच आहे दिवाळीनंतर अशी परिस्थिती उद्भवू शकते म्हणून जनशक्ती समोर हित असणारा हिटलर ही टिकू शकला नाही आणि आपला हा असणारा सैतान ही टिकू शकत नाही, एकत्र या आणि संघर्ष करा यावेळी ॲड आंबेडकर म्हणाले की 2024 च्या लोकसभा निवडणुक जिंकावी यासाठी नरेंद्र मोदी हे हिटलरने जे केल तेच करणार आहेत जो विरोधात जाईल त्याचा आवाज दाबला जाईल देशातील पाच हिंदू मंदिरांवर कारवाया करण्याचे प्रयत्न सुरू होते त्यासाठी मिलिटरीच्या ताब्यात मंदिरे द्यावी अशी मागणी मी केली ते तिथे बॉम्ब फोडून हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचा प्रयत्न होता मात्र तो बॉम्ब निशस्त्र केला सध्या मुस्लिम घरात हिंदू मुलगी आणि हिंदू घरात मुस्लिम मुलगी आहे, का याचा शोध आरएसएस घेत आहे प्रेम विवाह न राहता ते आता धार्मिक विवाह झाले आहेत लोकांची डोकी फोडण्याची ती आता राजकीय खेळी सुरू झाली आहे आपण या हुकूमशाही यंत्रणेविरुद्ध, एकत्र येऊन लढले पाहिजे असे आंबेडकर म्हणाले तर मात्र दुसरीकडे साताऱ्याचे बहुजन नेते सादिक भाई शेख म्हणाले समाज हा भयभीत झालेला आहे गुन्हेगार खुलेआम गुन्हा करतो तरीही त्याला शासन होत नाही संविधान संपुष्टात आलेल आहे संविधानानुसार कारवाया होत नाहीत जो निष्पाप जीव शहीद झाला त्या शहिदाला मारणाऱ्या मास्टरमाइंडला अटक होणार आहे की नाही? या देशात चूल आणि मूल केवळ या दोनच गोष्टी बाई करिता जन्माला आलेल्या होत्या अशा गोष्टींना आपल्या पायथाडाने लाथाडून तुम्हा आम्हाला शोषितांना वंचितांना जगण्याचा समानतेचा अधिकार दिला ज्या समानतेच्या अधिकारामुळे आज आपण इथं जातीय वाद्यांच्या विरोधात बंड करण्याकरिता एकत्र आलेलो आहोत जातीयवाद जर का उध्वस्त करायचा असेल तर आंबेडकरांचे विचार हे आपण सोबत घेऊन फिरलो पाहिजे आम्हाला अपेक्षा होती की छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज हे जातीयवाद विरुद्ध काहीतरी बोलतील परंतु त्यांनी एक विशिष्ट पातळीपर्यंतच आपली भूमिका ठेवली परंतु या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधान आणि या देशात आंबेडकर विचार जोपर्यंत आहेत तोपर्यंत जातीयवाद फुफाऊ देणार नाही संविधान वाचले पाहिजे हे आमचं मूळ धोरण आहे तर देश वाचेल आणि देश वाचला तर तुम्ही आम्ही वाचू आपण सर्वांनी एकत्र या आणि अन्यायाविरुद्ध लढा असे सादिक भाई शेख म्हणाले,

