अखेर हॉरीसन फोली थापा पॉइंट येथे चालू असलेले बेकायदेशीर पॅराग्लायडिंग तक्रारी केल्यानंतर बंद. पुन्हा चुकीच्या पद्धतीने परवानगी दिल्यास पर्यटन संचालनालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी एन पाटील यांच्या दालना समोर आंदोलन करू अनमोल कांबळे इम्रान शिरसागर,



सातारा प्रतिनिधी

देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या व थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असणाऱ्या पाचगणी महाबळेश्वर येथील मौजे दांडेघर हद्दीमधील सर्वे नंबर 10/ या सेन्सिटिव्ह झोन मध्ये ‌ पर्यटन संचालनालय मुंबई यांचे सह सहसंचालक यांनी संबंधितांनी सादर केलेल्या चुकीच्या अहवालावरती कुठलीही चौकशी न करता संबंधितांना एक वर्षाकरिता पॅराग्लायडिंग करण्याकरिता पत्र दिले होते परंतु पत्र ज्या ठिकाणी पॅराग्लायडिंग करण्याकरिता दिले त्या ठिकाणी संबंधितांनी पॅराग्लायडिंग चालू केलेच नाही तर सर्वे नंबर 10/ हॉरिसन फॉली थापा पॉइंट या ठिकाणी शासनाच्या नियमांचा अभंग करून स्थानिक अधिकाऱ्यांना हाताशी धरून देवस्थान जागेमध्ये ग्रामपंचायतीची परवानगी नसताना व मूळ मालकाची परवानगी नसताना राजरोसपणे पॅराग्लायडिंग हे चालू केले होते व ही गोष्ट समोर येताच अनमोल कांबळे इम्रान शिरसागर यांनी सहा संचालक प्रादेशिक कार्यालय पुणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून पर्यटन संचालनालय मुंबई सहाय्यक संचालक यांच्याशी संपर्क साधला संपर्क झाल्याच्या नंतर व मिळालेल्या कागदपत्रांच्या अनुषंगाने एक गोष्ट निष्पन्न झाली की संबंधितांनी पर्यटन संचालनालयाची दिशाभूल केलेली होती त्या अनुषंगाने वारंवार तक्रारी केल्यानंतरही पर्यटन संचालनालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी एन पाटील हे तक्रारदारांची बाजू ऐकून घेत नसल्याचे चित्र दिसत होते ‌ व त्या अनुषंगाने आम्ही पुन्हा एकदा लिखित तक्रारी या पर्यटन कार्यालयामध्ये दाखल केल्या पोलीस स्टेशन जिल्हाधिकारी कार्यालयाशी आम्ही वारंवार संपर्क करत होतो आणि तक्रारी केल्यानंतरनच सहा संचालक प्रादेशिक कार्यालय पुणे यांनी पाचगणी पोलीस स्टेशनला पत्र काढून सदर ठिकाणी चालणारे पॅराग्लायडिंग ची मुदत संपली आहे व त्या अनुषंगाने चाललेले पॅराग्लायडिंग ‌तात्काळ बंद करण्यात यावे असे सांगितले असे समजते व त्या अनुषंगाने पाचगणी पोलीस स्टेशन यांनी संबंधितांना पत्र काढून सदर ठिकाणी चाललेले पॅराग्लायडिंग बंद करा असे आदेश देखील दिले होते परंतु आदेश देऊन देखील पत्र देऊन देखील पोलिसांच्या पत्राला न जुमानता संबंधितांनी राजरोसपणे सदर ठिकाणी काही मिनिटात लाखो रुपये कमवून देणारा पॅराग्लायडिंग सारखा खेळ हा चालूच ठेवला होता व त्या अनुषंगाने आम्ही पुन्हा एकदा उपविभागीय पोलीस अधिकारी वाई यांच्याशी संपर्क साधल्यानंतर सदर ठिकाणी चाललेले पॅराग्लायडिंग हे बंद करण्यात आले आणि म्हणून इथून पुढे अशाप्रकारे पोलिसांच्या देखील पत्राला न जुमानणाऱ्या व बेकायदेशीर रित्या खोटी माहिती सादर करून पॅराग्लायडिंग करिता पर्यटन संचालनालयाकडून परवानगी प्रशिक्षण पत्र मिळवणाऱ्या लोकांच्या कागदपत्रांची योग्य पूर्तता करून योग्य कागदपत्रांची छाननी केल्यानंतरनेच संबंधितांना परवानगी देण्यात याव्यी अन्यथा पर्यटन संचालनालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी एन पाटील यांच्या दालनासमोर आम्ही आंदोलन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही कारण कमी वेळात लाखो रुपये कमवून देणाऱ्या खेळापेक्षा आम्हाला करोडो रुपयाचा सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या लेकराचा जीव प्यारी आहे तुमच्या पाकिटासाठी आम्ही दुसऱ्याचे घर उध्वस्त करू देणार नाही व कधी ते खपवून ही घेणार नाही असे अनमोल कांबळे इम्रान शिरसागर यांनी सांगितले,