साताऱ्यात लव्ह हिंदू जिहादची पुनरावृत्ती बलात्काराचा गुन्हा दाखल होईल या भीतीने पहिलं लग्न करून दहा दिवसातच दलित मुलीला सोडचिट्टी घेण्याकरिता दमदाटी एस पी साहेब पीडीतेला न्याय द्या पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड
प्रतिनिधी
अनमोल कांबळे
योजना उत्तम खवळे हिचे व सौरभ पराग जगताप याच्या गेल्या चार वर्षांपासून प्रेम संबंध होते परंतु त्यानंतर त्यांने ही मुलगी दलित आहे तिच्यासोबत आपल्याला राहायचं नाही परंतु अचानक रित्या हिला सोडली तर आपल्यावरती कलम 376 /354/ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल होतील या भीतीने सौरभ याने योजनाशी 25/6/2024/रोजी कोर्ट मॅरेज विवाह केला व त्यानंतर काही दिवसातच दिनांक 30/6/2024/ रोजी तिला सांगण्यात आले की तू खालच्या जातीची असल्याने आमच्या घरातल्यांना तू मान्य नसल्याने मला तुझ्याशी संसार करायचा नाही मला तू सोडचिट्टी दे असे सांगून मारहाण करत दमदाटी केली असल्याचे पिढीतेने सांगितले आहे, त्याच अनुषंगाने ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी हा मुद्दा हातात घेत पीडीतेच्या बाजूने शाहूपुरी पोलीस स्टेशन गाठले असल्याचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी सांगितले परंतु त्या ठिकाणी देखील पोलिसांनी आदित्य गायकवाड यांना उडवा उडवी ची उत्तरे देत आरोपीच्या बाजूने वकील पहिलेच त्या ठिकाणी हजर असल्याने या प्रकरणात काहीतरी शिस्तय अशी शंका आदित्य गायकवाड यांच्या लक्षामध्ये आल्याने आज रोजी त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे, निवेदनात म्हंटले आहे की त्वरित आरोपी वरती त्वरित ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करा आरोपीला कठोरात कठोर शासन करा येत्या दोन दिवसात आरोपीला कठोरात कठोर शासन न झाल्यास जिल्हाधिकारी यांच्या दालना बाहेर आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनामध्ये देण्यात आला आहे, येत्या दोन दिवसात पिढीतेला न्याय न मिळाल्यास व आरोपी वरती गुन्हा दाखल न झाल्यास पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे ऑल इंडिया पॅंथर सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी सांगितले आहे..,

