पाचगणी नगरपरिषद निवडणूक 2025 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर हरकतींचा पाऊस वॉर्डरचना बोगस नावे व अन्य विषयांवरती खडाजंगी निवडणूक आयोगाला सर्व हरकती पाठवणार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ग्वाही.!



प्रतिनिधी पांचगणी

पाचगणी नगरपरिषद निवडणूक 2025 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर हरकतींचा पाऊस वॉर्डरचना बोगस नावे व अन्य विषयांवरती खडाजंगी निवडणूक आयोगाला सर्व हरकती पाठवणार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ग्वाही.

नगरपालिका निवडणुकी संदर्भात शासनाकडून प्रभाग रचना जाहीर होतात आज वाई उपविभागीय प्रांताधिकारी वाई यांच्या दालना मध्ये पाचगणी नगरपालिका निवडणुकीसंदर्भात प्रभाग रचना हरकती संदर्भातील शेवटची तारीख देण्यात आली होती यासंदर्भात हरकतदारांनी आवर्जून हजेरी लावत आपापल्या हरकती नोंदवल्या असल्याचे पाहायला मिळाले विजय शंकर वन्ने यांनी वॉर्ड रचने संदर्भात हरकत नोंदवत मागासवर्गीय आयोगामध्ये सुरू असणाऱ्या युक्तीवादाचा दाखला देत नगर परिषदेने बनवलेले प्रभाग हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले व या संदर्भात कारवाई न केल्यास उच्च न्यायालयाचे देखील दरवाजे ठोठावणार असल्याचे सांगितले तर दुसरीकडे रंजन कांबळे म्हणाले मतदार याद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहे जो व्यक्ती पाचगणी शहराचा नागरिक नाही अशा व्यक्तींची नावे मतदार याद्यांमध्ये नमूद असून याचा निवडणुकीमध्ये विजय उमेदवाराला फडका बसणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले तर प्रकाश मोरे गुरुजी म्हणाले पाचगणी नगर परिषदेने जाहीर केलेल्या निवडणूक प्रभाग रचना जाहिरातीमध्ये एसी एसटी चा उल्लेख आहे मात्र सदर जाहिरातीमध्ये पाचगणी शहरात ओबीसी मतदारांचा उल्लेख नसून ही चिंतेची बाब आहे, निवडणूक आयोगाने तात्काळ हे जाहीर करावे की पाचगणी शहरात ओबीसी मतदार आहेत की नाहीत?तर अनमोल कांबळे म्हणाले ही निवडणूक प्रक्रिया मतदारांसह स्थानिकांना विचारात घेऊन पार पाडली पाहिजे मुख्याधिकाऱ्यांनी प्रत्येकाची मते जाणून घेतली पाहिजेत होती त्या शिवाय येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान होत असताना बाहेरील मतदार जो मतदान करायला येणार आहे तो पाचगणी शहराचा नागरिक आहे? का तो इथला रहिवासी आहे का? तरच त्याला मतदान करण्याचा अधिकार द्या बोगस मतदाराला मतदान करायला लावून विजय उमेदवाराला पराभूत करण्याचं हे षडयंत्र असू शकतं आणि म्हणून निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शकपणे पार पडली पाहिजे हवं तर मतदारांना आम्हीश दाखवणाऱ्याना लगाम घालण्यासाठी पोलीस भूत ची व्यवस्था उभी करा तर द्वारखानात प्रभाळे म्हणाले मी ज्या ठिकाणी राहतो तो वॉर्ड पूर्णपणे सध्या स्थितीमध्ये चुकीचा आखला गेला आहे व या अशा धोरणांमुळे प्रत्येक वेळेस त्या ठिकाणाहून धनदांडगा व्यक्ती पैशाच्या ताकती वरती निवडून येत असतो परंतु ज्या समाजाची त्या ठिकाणी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे व आम्ही आरक्षित जागेची वाट पाहत आहे ते आरक्षण अध्यापित त्या ठिकाणी पडलेले नसून ते लवकरात लवकर पडावे या सह अनेक विषयांवरती हरकती नोंदवत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हरकतदारांनी आपल्या हरकती नोंदवल्या असून या सर्व हरकती निवडणूक आयोगाला पाठवून देऊ असे मत निवडणूक निर्णय अधिकारी योगेश खरमाटे यांनी सांगितले असल्याचे पाहायला मिळाले यावेळी भीम आर्मी संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक चव्हाण संजय वन्ने आरुन घाडगे दिपक सपकाळ व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.