पाकिस्तान ते पाचगणी प्रकरणातील ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या आंदोलनाला अखेर पहिलं यश जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड.



प्रतिनिधी सातारा

पाकिस्तान ते पाचगणी प्रकरणातील ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या आंदोलनाला अखेर पहिलं यश जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड

दिनांक 15 ऑगस्ट दिवशी पाकिस्तान ते पाचगणी या विषयातील पाचगणी येथील सर्वे नंबर 128/ मधील पाकिस्तान नावाचा सातबारा फाडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने निषेध करण्यात आला होता व हा निषेध करत असताना ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाभरातून कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते परंतु ही संघर्षाची लढाई लढत असताना ऑल इंडिया पॅंथर सेना तक्रारदार अनमोल कांबळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती व काल रोजी देखील अनमोल कांबळे यांना हायकोर्ट चे नोटीस मिळाल्यानंतर ऑल इंडिया पॅंथर सेना त्यांच्या पाठीशी उभी आहे हे आम्ही त्यांना ठणकावून सांगितले होते परंतु आज रोजी तहसीलदार महाबळेश्वर तेजस्विनी पाटील यांनी मंडलाधिकारी पाचगणी यांना पत्रक काढून सातबार्या वरील पाकिस्तानी नाव बदलण्याकरिता सांगितले असल्याने हा ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या आंदोलनाचा या प्रकरणातील पहिला विजय असून इथून पुढे देखील ऑल इंडिया पॅंथर सेना जिल्हा मध्ये कुठेही अन्याय अत्याचार किंवा चुकीचा प्रकार घडत असल्यास त्याला वाचा फोडण्याचे काम ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या माध्यमातून झाल्याशिवाय राहणार नाही कुठल्याही कार्यकर्त्याला कसलीही गरज भासल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा असे ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी सांगितले यावेळी अनमोल कांबळे आशिष मोरे तुषार वायदंडे सिद्धार्थ गायकवाड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.