महाबळेश्वरातील भौसे येथील सर्व फायनल प्लॉट सर्व्हे नं.३१ मधील कारवाईकडे जिल्ह्याच्या नजरा….!अवैध्य बांधकामाची अखेर १३ महिन्यानंतर चौकशी पूर्ण सातारा जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेणार.?



प्रतिनिधी

दिनांक 3-7-2025

सातारा जिल्ह्यातील मौजे भौसे ता.महाबळेश्वर येथील सर्व्हे नंबर ३१व त्या मधील सर्व फायनल प्लॉट म्हणजेच सध्याचे विंडसर पार्क रिवाईज बंगलो येथील मिळकतीचा क.जा.प पत्रक फाळणी नकाशा,मोजणी नकाशा इत्यादी आजपर्यंत कधीही झालेले नसून सर्व्हे नंबर ३१ मधील सर्व फायनल प्लॉट व विंडसर पार्क रिवाइज बंगलो हे बेकायदेशीर असल्याचे खुद्द महाबळेश्वर तहसिलदार यांनी दिलेल्या एका पत्रामुळे शिक्कामोर्बत झाले असून याबाबत कारवाई संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार आम्हाला नसल्याचे महाबळेश्वर तहसीलदार यांनी निर्देश दिले आहेत. सदर प्रकरणाचा पूनम (कांबळे)गोळे यांनी तेरा महिने पाठपुरावा केला आहे. महसूल अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या लेखी पत्रात चौकशी पूर्ण झाल्याचे सुद्धा सांगण्यात आले आहे. सर्व्हे नंबर ३१मध्ये जागेच्या क्षेत्रफळात(कजाप पत्रात) कोणतेही बदल केल्याचे शासन दरबारी नोंद नसल्याची लेखी माहिती भूमी अभिलेख आणि नगररचना विभाग जिल्हाधिकारी कार्यालय अशा शासकीय कार्यालयातून लेखी स्वरूपात देण्यात आली आहे. त्यामुळे सातारा जिल्हाधिकारी यांनी ते बांधकाम अनधिकृत म्हणून घोषित करून सदर बांधकाम तात्काळ पाडण्यात यावे अशी मागणी पूनम (कांबळे)गोळे यांनी जिल्हाधिकारी सातारा यांचेकडे केली असून २९जून रोजी सर्व पुराव्यासह निवेदन दिले आहे. वरील प्रकरणाबाबत पूनम अशोक (कांबळे)गोळे यांनी १०जून २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला होता त्या चौकशी कामी २६जून २०२४रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार संजय बडेकर उपविभागीय अधिकारी वाई यांना कार्यालयीन पत्र दिले होते .यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी १८जुलै २०२४रोजी महाबळेश्वर तहसीलदार यांना आदेश दिले होते.महाबळेश्वर तहसिलदार यांनी चौकशी कामी २६जुलै २०२४ रोजी मंडलाधिकारी पाचगणी यांना चौकशीचे आदेश दिले. यानंतर मंडलाधिकारी यांनी चौकशी व फेर करून तहसिल कार्यालय महाबळेश्वर यांचेकडे दिनांक २७जानेवारी २०२५ रोजी अहवाल सादर केला होता.तक्रारदार पूनम (कांबळे)गोळे यांनी प्रत मागितली असता ४एप्रिल २०२५रोजी लेखी पत्र पाठवले व यामध्ये सर्व्हे नं.३१ बाबतचा अहवाल दिनांक २७जानेवारी २०२५ रोजी तहसीलदार महाबळेश्वर कार्यालयात जमा केलेला आहे व संबंधित अहवाल कार्यालयातून घ्यावा असे सांगण्यात आले. त्यानंतर माहिती अधिकारात दिनांक १६एप्रिल २०२५रोजी अहवालातील व मूळ तक्रार अर्जातील मागणी क.जा.प पत्रक,फाळणी नकाशा,मोजणी नकाशा याची मागणी केली असता तहसिल कार्यालय महाबळेश्वर येथील जनमाहिती अधिकारी तथा महसूल नायब तहसिलदार विनोद सावंत यांचेकडून २४ एप्रिल२०२५ रोजी कळविण्यात आले की पाचगणी मंडलाधिकारी यांच्या १८फेब्रुवारी २०२५च्या अहवालानुसार क.जा.प पत्रक मोजणी नकाशा फाळणी नकाशा संचिकेमध्ये आढळून येत नाही असे सांगण्यात आले. यानंतर ५जून २०२५ रोजी महाबळेश्वर तहसिलदार यांना तक्रारदार पूनम (कांबळे)गोळे यांनी पत्र लिहून सर्व्हे नंबर ३१ चा कजाप पत्रक फाळणी नकाशा,मोजणी नकाशा, जोता प्रमाणपत्र बांधकाम पूर्णत्वाचा दाखला,बिगर शेती आदेशाचा भंग यापैकी काहीही उपलब्ध नसल्याने सर्व्हे नंबर ३१मधील मंजूर आराखडा तत्काळ रद्द करावा अशी मागणी केली असता महाबळेश्वर तहसिलदार तेजस्विनी खोचरे पाटील यांनी १८जून २०२५ सदर प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे मात्र कारवाईचा अधिकार मला नसल्याने हे प्रकरण निकाली काढत आहे असे लेखी पत्र पूनम (कांबळे) गोळे यांना दिले असल्याने महाबळेश्वर तालुक्यातील पर्यावरणाचे सर्व नियमांची पायमल्ली करून मंजूर आराखडा हा बोगस घेऊन शासनाची दिशाभूल करीत पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील नियमांचा भंग केला आहे असे निवेदनात नमूद केले असून वरिष्ठ पातळीवरून चौकशी पूर्ण झाल्याने महाबळेश्वर तालुक्यातील भौसे येथील सर्व्हे नंबर ३१ मधील रिव्हिजन बंगलो प्लॅन व सर्व बांधकामे अनधिकृत घोषित करून तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे किंवा मग संपूर्ण महाबळेश्वर हा तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना घर बंगला हॉटेल बांधताना धनदांडग्यां सारखेच बिगरशेती मोजणी फाळणी नकाशा अथवा बांधकाम करण्यासाठी शासकीय परवानगीची आवश्यकता नाही उत्खनन हा विषयच पूर्णतः कायमस्वरूपी समाप्त किंबहुना तो महाबळेश्वर तालुक्याला लागूच होऊ शकत नाही असे तरी लोकहितार्थ जाहीर करावे असे पूनम कांबळे यांनी मागणी केली आहे…त्याच बरोबरमंडलाधिकारी मुळीक यांच्यावर लवकरच कायदेशीर “ट्रीटमेंट” होणार..?* सदर प्रकरणी फेरचौकशी सुरू असताना लेखी पुराव्यानिशी म्हणणे देऊनही मंडल अधिकारी मुळीक आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी यांनी तहसीलदार यांना ते दिले नाही.असे त्यांच्या पत्रातून निदर्शनास आले मुळीक हे वारंवार खोटं बोलत असून शासकीय कागदपत्रांची हेळसांड करणे वरीष्ठ व तक्रारदार यांना खोटी व दिशाभूल करणारी माहिती देणे तक्रारदार आणि वरिष्ठांमध्ये मतभेद पसरवून बाहेर च्या बाहेर आनंद लूटने या अनुषंगाने मी मुळीक व त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी ज्यांनी मला कार्यालयीन पोहोच दिली यांच्या विरुद्ध मी पाचगणी पोलीस ठाण्यात रीतसर पुराव्यानिशी तक्रार दाखल करणार आहे . असल्या शासकीय लोभी एजंट लोकांच्या मुळे जनमानसात आमची प्रतिमा मलीन होते व हेच लोक आमचा अपप्रचार करतात हे आता खपवून घेतलं जाणार नाही *जिल्हाधिकारी यांचा एक निर्णय संपूर्ण तालुक्याला…..* महाबळेश्वर तालुक्यात भौसे येथील सर्व्हे नंबर ३१ या मिळकतिचे कजाप पत्रक फाळणी नकाशा,मोजणी नकाशा थोडक्यात सांगायचे तर क्षेत्रफळात बदल झाल्याचे परिपत्रक शासन दरबारी कुठेही नोंद असल्याचे आढळून न आल्याने सदर बांधकाम अनधिकृत आहे हे उघड झाले असतानाही जर हे बांधकाम वैद्य ठरवले तर सातारा जिल्हाधिकारी यांचा एक निर्णय महाबळेश्वर तालुक्यातील ७०ते ८०हजार रहिवाशांना लागू होऊ शकतो त्यामुळे जिल्हाधिकारी काय निर्णय घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.