सातारा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या असलेल्या निवासस्थानाचे तात्काळ सुशोभीकरण करा पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणार..,
सातारा प्रतिनिधी
सातारा येथील सदर बाजार या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या असलेल्या निवासस्थानाची सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याचे चित्र एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे, ज्या सातारा जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले शिकले त्या सातारा जिल्ह्यातील बाबासाहेब आंबेडकरांच्या घराची ही अवस्था पाहून संपूर्ण सातारा जिल्ह्यातून संतापाच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत असताना आता ऑल इंडिया पॅंथर सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच निवेदन देणार असल्याचे सांगितले आहे, बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाचे आठ दिवसाच्या आत सुशोभीकरण करा तिथे राहत असलेल्या लोकांचे योग्य त्या ठिकाणी स्थलांतर करा त्यांना चांगल्या दर्जाची घरे द्या व बाबासाहेब आंबेडकरांच्या घराचे सुशोभीकरण करून ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर राहिले शिकले मोठे झाले ते ठिकाण लोकांच्या प्रेरणे करिता खुले करा असे ऑल इंडिया पॅंथर सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी सांगितले..,

