ज्यांनी भारत देशाचे संविधान लिहिले ज्यांच्या संविधानावरती संपूर्ण देश चालतो त्याच भारत देशाचे संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला विरोध होणे योग्य आहे का?
सातारा प्रतिनिधी
बेडग (ता. मिरज) येथील गावातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान ग्रामपंचायतीकडून पाडल्याच्या निषेधार्थ अनुयायांनी पुन्हा पायी लाँग मार्च सुरू केला आहे. घरांना कुलपे लावून बॅगा भरून चिमुकले वयोवृद्ध पुन्हा एकदा मुंबई मंत्रालयाच्या दिशेने निघाले आहेत. तो लाँग मार्च आज कऱ्हाडमधून पुढे मार्गस्थ झाला. मात्र, लाँग मार्चमधील चौघांची प्रकृती अशक्तपणामुळे खालावली. त्यांना येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून हा लॉंग मार्च आता पुढे कुठपर्यंत जाणार आणि अनुयायींच्या मागण्या पूर्ण होणार का? हे बघणे गरजेचे आहे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासना नंतर हा लॉंग मार्च काही काळ थांबला होता परंतु उपमुख्यमंत्र्यांच्याच आदेशाला ग्रामपंचायतीने केराची टोपली दाखवल्याने भारत देशाचे संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध होत असेल त्या गावात आम्हाला राहायचं नाही असा पवित्रास अनुयायांनी घेतला असून या त्यांच्या क्रांतीला कुठपर्यंत यश प्राप्त होते हे पाहणे गरजेचे आहे मुख्यमंत्री स्वतः लक्ष देणार का? पुन्हा एकदा बेडक गावामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची स्वागत कमान उभी राहणार का? हे बघणे आता गरजेचे आहे,

