प्रतिनिधी सातारा
मौजे पाटखळ बेपत्ता शरद मधुकर पवार खून खटल्या प्रकरणी न्यायालयात ॲड विकास पाटील शिरगावकरांचा जोरदार युक्तिवाद युक्तिवादानंतर पोलिसांवर पुरावा नष्ट केल्याचा ठपका सर्व आरोपींना जामीन मंजूर.
मौजे पाटखळ (ता. सातारा) येथील शरद मधुकर पवार यांच्या सण दिनांक ८/८/२०२३ मध्ये बेपत्ता प्रकरणाने पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडवली होती. या प्रकरणी झालेल्या तपासात अनेक गंभीर बाबी न्यायालयासमोर मांडण्यात आल्या दिनांक ८/८/२०२३ रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद झालीदिनांक ९/८/२०२३ रोजी पाटखळ पाण्यात अनोळखी इसमाचा सडलेला मृतदेह सापडला सबब सातारा तालुका पो ठाणे येथे अ मयत गुन्हा दाखल व तपास सुरू झाला चौकशी कामी संबंधित व संशयितांना ताब्यात घेतले गेले होते व चौकशी करून दि ११/८/२०२३ रोजी सातारा तालुका पो. ठाणे येथे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता या प्रकरणी न्यायालयासमोर अधोरेखित केलेले मुद्दे मिसिंग अहवाल व मृतदेहावरील कपडे वेगळे मिसिंग अहवालातील कपड्यांचा रंग व मृतदेहावरील कपड्यांचा रंग भिन्न असल्याचे दिसून आले मयत पंचनाम्यात फेरफार झाला असल्याचे न्यायालयाच्या समोर आणून दिले मृतदेहाचा पंचनामा दिनांक ९/८/२०२३ रोजी घटनास्थळी करण्यात आला. सुरुवातीला नमूद नसताना नंतर छोट्या अक्षरात “हातावर ॐ गोंदलेली खूण” व “हातात पिवळा दोरा” असा उल्लेख लिहण्यात आला.-मिसिंग व पीएम अहवालात तफावत मिसिंग व पीएम अहवालात “ॐ गोंदलेली खूण” व “पिवळा दोरा” नमूदच नाही.पुरावा नष्ट मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी महत्त्वाचे असलेले घटक पोलिसांनीच नष्ट केल्याचे समोर आले. प्रत्यक्षात अशा घटकांवर डीएने चाचणी घेऊन मयत हा कोणाचा मुलगा व भाऊ आहे याची ओळख निश्चित केली जाऊ शकली असती परंतु तो तपास पोलिसांनी केला नाही पोलिसांना असे मिळालेले घटक व पुरावा नष्ट करण्याचा अधिकार नसताना ते नष्ट करण्यात आले या गंभीर तफावती व पोलिसांच्या कारवाईविषयीचे मुद्दे मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश-१, सातारा यांच्यासमोर ॲड. विकास बाबुराव पाटील-शिरगांवकर यांनी ठळकपणे मांडले त्यांनी मे.न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, पोलिसांनी जबाबदारी पडू नये म्हणून महत्त्वाचा पुरावा नष्ट केला असून, या कृतीमुळे तपासाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत सदर युक्तिवाद ऐकून मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश-१, सातारा यांनी दिनांक १२/९/२०२५ रोजी आरोपी क्र. १ व आरोपी क्र. २ यांना जामीन मंजूर केला.विशेष म्हणजे, आरोपी क्र. ३ दादा जयराम बिचुकले यांचा जामीन अर्ज सन २०२४ पासून न्यायालयात प्रलंबित होता व पूर्वीच्या विधिज्ञांनी सुमारे ५८ मुदती/तारखा घेतल्या, पण युक्तिवाद करण्यात आला नाही शेवटी संबंधित पक्षकारांनी ॲड. विकास पाटील-शिरगांवकर यांना लेखी पत्र देऊन वकिल पत्र घ्यावे अशी विनंती केली व वकिलपत्र दिले दि.३/९/२०२५ रोजी ॲड विकास पाटील-शिरगांवकर यांनी सदरकामी नाहरकत घेऊन वकीलपत्र दाखल केले व केवळ ९ दिवसांत प्रभावी युक्तिवाद केला आणि दिनांक १२/९/२०२५ रोजी गुण्यातील सर्व आरोपींना मेहरबान न्यायालयाने जामीन मंजूर केले असल्याचे निदर्शनास आले यानंतर न्यायालयामध्ये उपस्थित असणाऱ्या वेगवेगळ्या पक्षकारांनी आपल्या प्रतिक्रिया देत सांगितले या प्रकरणातील गंभीर कायदेशीर मुद्दे व पोलिसांच्या तपासातील त्रुटी ॲड शिरगावकर यांनी न्यायालयासमोर ठळकपणे मांडल्यामुळे भविष्यात अशा प्रकरणांमध्ये निर्दोष व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी व तपासातील त्रुटी उजेडात आणण्यासाठी ॲड.विकास पाटील-शिरगांवकर (माजी जिल्हा सरकारी वकील (सातारा) यांचीच भूमिका भविष्यात वकीली क्षेत्रात महत्त्वाची ठरणार आहे.

