ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हा महासचिव आशिष मोरे यांच्या आंदोलनाने सातारा नगरपालिका दणाणली.



प्रतिनिधी सातारा

सातारा शहरातील रस्त्याच्या ढिसाळ डांबरीकरणाच्या निषेधार्थ ऑल इंडिया पॅंथर सेनेचे महासचिव आशिष मोरे यांनी पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहरातील मुख्य रस्त्याच्या निकृष्ट डांबरीकरणा संदर्भात आज रोजी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे महासचिव आशिष मोरे महिला जिल्हाध्यक्ष सविता सपकाळ सातारा शहर अध्यक्ष सुशांत वायदंडे जिल्हा सरचिटणीस सिद्धार्थ गायकवाड जावली तालुका अध्यक्ष आनंदा कांबळे या सर्व आंदोलकांनी मिळून सातारा नगर परिषदेच्या बाहेर सातारा शहरातील रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणा संदर्भात निदर्शने आंदोलन आज रोजी केले असल्याचे दिसून आले आंदोलन सुरू होताच अधिकारी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात धावपळ दिसून आली होती, रस्ता दुरुस्ती डांबरीकरण करणारा ठेकेदार हा बीएमडब्ल्यू गाडीतून येतो मात्र गाडीतून येऊन गाडीमध्येच बसून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करतो ड्रायव्हरला खाली उतरून रस्त्याचे माप घ्यायला लावतो जो ठेकेदार कधी रस्त्यावरती उतरत नाही तो ठेकेदार रस्त्याचे काय काम करणार असा असणार प्रश्न या आंदोलनाचा प्रमुख मुद्दा ठरला, होता आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत रस्त्याच्या कामाचा निषेध केला व मुख्याधिकारी यांचा देखील या ठिकाणी निषेध करत सातारा नगरपरिषदेमध्ये फोफवलेला भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे अशा घोषणा देत आंदोलकांनी प्रशासनातील मुख्याधिकारी बापट यांचा देखील निषेध करत आपला निषेध नोंदवला असल्याचे दिसून आले आहे त्यानंतर सातारा नगर परिषदेचे अधिकारी यांनी समक्ष आंदोलकांची भेट घेऊन लवकरात लवकर ठेकेदारांवरती कारवाई करून चांगल्या दर्जाचे रस्ते नागरिकांच्या सोयीस अर्पण करू अशी ग्वाही दिल्यानंतर जिल्हा महासचिव आशिष मोरे यांनी पुकारलेले आंदोलन निवेदन देऊन समाप्त करण्यात आले.