प्रतिनिधी सातारा
सातारा एमआयडीसी मध्ये सुरू असणारी गुटखा कंपनी सील करा नंतर छोट्या टपरी चालकांवरती कारवाया करा पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांची पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी.
सातारा जिल्हा हा क्रांतीकारांचा जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये नशेचं विष पेरणारे विषारी आले तरी कुठून? पोलीस करतायत तरी काय? असा असणारा प्रश्न ऑल इंडिया पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी उपस्थित केला असल्याने दोन नंबर व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले असल्याचे दिसून आले आहे, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी पोलीस अधीक्षकांनां निवेदन देऊन सातारा शहरांमध्ये ज्या ज्या ठिकाणी गुटखा व्यवसाय सुरू आहे त्या व्यवसायाची सविस्तर माहिती निवेदनाद्वारे सादर केली असून येत्या आठ दिवसांमध्ये जर का कारवाई झाली नाही तर निषेच्या विरुद्ध नशेच्या निषेधार्थ लॉंग मार्च काढणार असल्याचे ऑल इंडिया पॅंथर सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आदित्य गायकवाड पुढे जाऊन म्हणाले हे निवेदन नसून साताऱ्यातील युवा पिढी बरबाद होत असताना थांबवण्याचे पॅंथर सेनेने आखलेले धोरण आहे व त्याची अंमलबजावणी पोलीस अधीक्षकांनी लवकरात लवकर करावी नशेचा बाजार करणाऱ्या साताऱ्यातील माफियांवरती कोठोऱ्यात कठोर कारवाई करावी कारवाई करत असताना जर का या नशेच्या माफीयांची संघटना व संघटित गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात जिल्ह्याबाहेर असल्यास या माफियांवरती मकोका कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी टपरी वाल्याला एक न्याय आणि सातारा शहरासह जिल्हाभर नशेचा बाजार उभा करणाऱ्या माफियाला एक न्याय हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही असे ऑल इंडिया पॅंथर सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

