राज्यभर होणाऱ्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता ॲड विकास पाटील शिरगावकर यांची राज्यातील गंभीर घटनांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करा आदित्य गायकवाड यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे मुख्यमंत्र्यांना निवेदन सुपूर्त.!



प्रतिनिधी सातारा

राज्यभर होणाऱ्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता ॲड विकास पाटील शिरगावकर यांची राज्यातील गंभीर घटनांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करा आदित्य गायकवाड यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे मुख्यमंत्र्यांना निवेदन सुपूर्त.!

राज्यातील होणाऱ्या महिला अत्याचार व कायदा सुव्यवस्थेच्या विरोधातल्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता कायदे तज्ञ वकील ॲड विकास पाटील शिरगावकर यांची राज्यातील गंभीर प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करा अशा आशयाचे पत्र पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी आज सातारा जिल्हाधिकारी यांना दिले असून लवकरच मा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन सुपूर्द करणार असल्याचे पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी सांगितले आहे आदित्य गायकवाड पुढे म्हणाले राज्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या होणाऱ्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता राज्यातील कायदा सुव्यवस्था चावट्यावरती आली असल्याचे दिसून आले आहे, या संदर्भात आज आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे पत्र देऊन कळविले आहे की राज्यामध्ये होणाऱ्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता कायदे तज्ञ वकिलांची गरज आपल्या राज्याला असल्याने सातारा जिल्ह्यातील कायदे तज्ञ विचारवंत वकील ॲड विकास पाटील शिरगावकर यांची राज्यातील गंभीर प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशा आशयाचे पत्र आम्ही दिले असून लवकरच उपमुख्यमंत्री मा: एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटून देखील निवेदनाद्वारे जिल्ह्याच्या वतीने आमचा प्रस्ताव आम्ही सादर करणार असून राज्याचे मुख्यमंत्री मा: देवेंद्र फडणवीस साहेब यांना देखील या गंभीर प्रश्नावरती भेटणार असल्याचे पॅंथर सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.