ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड.!



प्रतिनिधी सातारा

ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड.

लोकांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरून सामाजिक चळवळीचा लढा लढणाऱ्या सातारा जिल्ह्यातील ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवरती जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी नवीन जबाबदारी टाकली असल्याचे दिसून आले आहे, शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी सामाजिक चळवळीचा लढा आणखी तीव्र करण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे, यामध्ये पॅंथर सेना महिला जिल्हाध्यक्ष ॲड सौ जिलशाद मुल्ला तर दुसरीकडे मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष म्हणून संदीप भाऊ झोंबाडे रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष अजय घाडगे रोजगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष ज्योतीताई गंगावणे रोजगार आघाडी जिल्हा महासचिव राहुल ढाले रोजगार आघाडी जिल्हा संघटक सौ ममता ताई पवार यांची नियुक्ती पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली आहे, यावेळी पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड बोलताना म्हणाले पॅंथर सेना ही या सातार्या जिल्ह्यामध्ये कार्यरत असून समाजाच्या वंचित घटकाला न्याय देण्याचे शासन दरबारी काम करत आहे, परंतु काम करत असताना कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचे काम काही शासकीय अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक सुरू आहे, परंतु कार्यकर्त्यावरती कितीही दबाव आणला तरी बाबासाहेब आंबेडकरांचे धोरण आमच्या डोळ्यासमोर आहे, की हजार दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा लढला नाहीस तरी चालेल परंतु विकला जाऊ नकोस हे धोरण आम्ही डोळ्यासमोर ठेवले आहे आणि अन्यायाला वाचा फोडण्याचे काम या पॅंथर सेनेच्या माध्यमातून जिल्हाभर सुरू आहे, म्हणून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना एकच सूचित करू इच्छितो की तुमच्यावरती दिलेली जबाबदारी ही कार्यकर्त्या वरती व समाजातल्या वंचिता वरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारी आहे ती आपण योग्यरित्याने पुढे न्यावी इतकेच सुचित करतो आणि पदाधिकाऱ्यांवरती टाकलेली जबाबदारी योग्यरीत्या पदाधिकारी पुढे नेतील याची ग्वाही देतो आणि थांबतो असे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी सांगितले.