पुणे स्वारगेट बस स्टॅन्ड अतिप्रसंग प्रकरणांमध्ये पिढीतेच्या वतीने न्यायालयामध्ये बाजू मांडण्याकरिता सरकारने विकास पाटील शिरगावकर यांची नियुक्ती करावी आदित्य गायकवाड यांचे जिल्हाधिकाऱ्यांन सह मुख्यमंत्र्यांना पत्र.‌!



प्रतिनिधी सातारा

पुणे स्वारगेट बस स्टॅन्ड अतिप्रसंग प्रकरणांमध्ये पिढीतेच्या वतीने न्यायालयामध्ये बाजू मांडण्याकरिता सरकारने विकास पाटील शिरगावकर यांची नियुक्ती करावी आदित्य गायकवाड यांचे जिल्हाधिकाऱ्यांन सह मुख्यमंत्र्यांना पत्र.‌

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील युवती वरती पुणे स्वारगेट बस स्टॅन्ड येथे घडलेल्या अतिप्रसंगांमध्ये महाराष्ट्र सरकारने आरोपीला अटक केली असल्याने पीडितेच्या बाजूने सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयामध्ये बाजू मांडण्याकरिता सातारा जिल्ह्याचे कायदे तज्ञ वकील विकास पाटील शिरगावकर यांची नेमणूक करावी अशा आशयाचे पत्र आज रोजी जिल्हाधिकाऱ्यांन सह मुख्यमंत्र्यांना पाठवले असल्याचे पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आदित्य भाऊ गायकवाड यांनी सांगितले आदित्य गायकवाड पुढे म्हणाले पुण्यासह सातारा जिल्ह्याला हादरवणारी घटना पुणे स्वारगेट बस स्टॅन्ड मध्ये घडली आहे या घटनेचा सातारकर म्हणून तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो परंतु हा विषय निषेध करून थांबणार नसून सातारच्या लेकीला न्याय देण्याकरिता सातारा जिल्ह्याचे कायदे तज्ञ वकील विकास पाटील शिरगावकर यांची नेमणूक या प्रकरणांमध्ये सरकारच्या वतीने करण्यात यावी व पिढीतेला न्याय देण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने करण्यात यावा अशा आशयाचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांन सह मुख्यमंत्र्यांना आम्ही दिले असून आम्हाला विश्वास आहे लवकरच या प्रकरणांमध्ये विकास पाटील शिरगावकर यांची नेमणूक महाराष्ट्र सरकारच्या वतीने करण्यात येईल व पिढीतेला न्याय देण्याचा प्रयत्न या सरकारच्या वतीने होईल असे पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आदित्य भाऊ गायकवाड यांनी सांगितले.