आकाशवाणी झोपडपट्टीतील पाण्याच्या टंचाई संदर्भात जीवन प्रधिकरणाच्या अधिकारी गडकरी यांच्या मनमानी कारभाराविरोधात जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार.



आकाशवाणी झोपडपट्टीतील पाण्याच्या टंचाई संदर्भात जीवन प्रधिकरणाच्या अधिकारी गडकरी यांच्या मनमानी कारभाराविरोधात जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार.

प्रतिनिधी सातारा

आकाशवाणी झोपडपट्टीतील पाण्याच्या टंचाई संदर्भात गुरुवारी पॅंथर सेना महिला जिल्हाध्यक्ष सविता सपकाळ यानी जीवन प्राधिकरण अधिकारी गडकरी यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत आवाज उठवला होता व त्याच अनुषंगाने गडकरी यांचा मनमानी कारभार झोपडपट्टी वासियांवरती चालूच राहिल्याने आता पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी स्वतःच हा संपूर्ण विषय हातामध्ये घेत अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराच्या विरोधात एल्गार पुकारल्याचे दिसत आहे, या संदर्भात आदित्य गायकवाड यांनी सांगितले की आकाशवाणी झोपडपट्टी येथील काही मागासवर्गीय गोरगरीब कष्टकऱ्यांनी पाण्याची बिले भरली नाहीत हा ठपका ठेवत जीवनप्रधिकरणाचे अधिकारी गडकरी यांनी त्यांचे पाणी कनेक्शन कट केले होते परंतु त्यांना त्यातील अनेक लोकांनी सांगितले की आम्ही टप्प्याटप्प्याने थकलेली बिले पूर्ण भरू परंतु पाणी हे मनुष्याचा मूलभूत अधिकार हक्क असल्याने तुम्ही सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांकरीता पाणी सुरळीत करून द्या परंतु आपला मनमानी कारभार चालू ठेवत गडकरी यांनी लोकांना पाण्यापासून वंचित ठेवत आपला हुकूमशाही बाणा हा कायम ठेवला असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या महीला जिल्हाध्यक्ष सविता सपकाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत तात्काळ गडकरी यांच्यावरती कारवाई करा अशी मागणी केली होती, परंतु आता स्वतः या विषयामध्ये पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी सांगितले आहे, की नवनिर्वाचित जिल्हाधिकारी यांना सोमवारी भेटून झोपडपटीवासी यांच्या सर्व समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत गडकरी यांच्या विरोधात जन आंदोलन करावे लागले तरी चालेल परंतु गोरगरिबांना पाण्याचा हक्क हा मिळालाच पाहिजे याच पाण्याच्या हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता परंतु त्याच सत्याग्रहाच्या आंदोलनाची पुनरावृत्ती या क्रांतिकारक सातारा जिल्ह्यामध्ये करावी लागली तरी चालेल परंतु गोरगरिबांना मागासवर्गीयांना आपल्या हक्काचे पाणी मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असे ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी सांगितले.