विशाल भोसले यांचा झंझावात पाटण तालुक्यामध्ये रिपब्लिकन सेना पाटण तालुक्यात भक्कम करणार! विशाल भोसले

विशाल भोसले यांचा झंझावात पाटण तालुक्यामध्ये रिपब्लिकन सेना पाटण तालुक्यात भक्कम करणार! विशाल भोसले

September 27, 2022 | महाराष्ट्र

पाटण प्रतिनिधी

दि 26/9/2022 रोजी
पाटण येथे रिपब्लिकन सेनेची आढावा बैठ शासकीय विश्रामगृहात पार पडली या बैठकीला विशाल भोसले यांनी संबोधित केले तसेच तालुकाध्यक्ष सचिन कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये तालुक्याचा आढावा घेण्यात आला. तसेच तालुक्यातील विविध प्रश्नांवर आंदोलने उभारून रिपब्लिकन सेना पाटण तालुक्यात भक्कम करण्याकरिता कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत या सर्व निवडणुका रिपब्लिकन सेनेच्या वतीने सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली लढवण्याकरिता कार्यकर्त्यांनी पाटण तालुक्यामध्ये कामाला लागण्याचे आदेश विशाल भोसले यांनी पाटण तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांना दिले यावेळी तालुका कार्यकर्ता मेळावा लवकरच घेण्यात येईल असे प्रतिपादन सचिन कांबळे यांनी केले याप्रसंगी भीमराव तांदळे यांची तालुका सचिव पदी तर सहसचिव पदी अमर सपकाळ यांची निवड करण्यात आली या बैठकीस सातारा तालुका अध्यक्ष रमेश गायकवाड, पाटण तालुका उपाध्यक्ष सुधाकर देवकांत, प्रकाश कांबळे, दगडू तांदळे अमर देवकांत, हनुमंत कांबळे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र

Related Posts

मौजे दांडेघर गाव विकले आहे असे भासवून पूनम कांबळे यांना बदनाम करणाऱ्या ची चौकशी करून अहवाल सादर करा सातारा पालकमंत्र्यांचे पोलीस अधीक्षकांना आदेश.

September 26, 2022

सातारा प्रतिनिधी महाबळेश्वर तालुक्यातील मौजे दांडेघर हे गाव विकले आहे असे सांगून लोकांची माती भडकवणाऱ्या व दोन समाजामध्ये तेढ निर्माण…

रात्रीचा दिवस करून कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी करणार एकाग्रतेने रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले

September 28, 2022

प्रतिनिधी:किरण अडसूळ दि.२७मंगळवार सातारा,वाई,पाटण तालुक्या बरोबर आज खंडाळा मोर्वे या ठिकाणी रात्री उशीर झाला असताना सुद्धा कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव जिल्हाध्यक्ष विशाल…