भिवंडी वडगाव गोदाम आग प्रकरणी ॲड विकास पाटील शिरगावकर यांचा भिवंडी न्यायालयात जोरदार युक्तिवाद..!



प्रतिनिधी भिवंडी

भिवंडी वडगाव गोदाम आग प्रकरणी ॲड विकास पाटील शिरगावकर यांचा भिवंडी न्यायालयात जोरदार युक्तिवाद.

भिवंडी तालुक्यातील वळगाव ग्रामपंचायत येथे काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगी प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा -२००५ कलम ५५ प्रमाणे आदेश काढले नाहीत त्यामुळे त्यांनीही आरोपी करावे असा जोरदार युक्तिवाद आज भिवंडी न्यायालयात विकास पाटील शिरगावकर यांनी केला असल्याचे निदर्शनास आले आहे युक्तीवादामध्ये म्हटले आहे अर्जदार महिला ही वेअरहाऊस व्यवसायाशी संबंधित असून त्या ठिकाणी पुढील वस्तु फर्निचर, मोटार वाहने, गॅस व तेल, रसायने व वस्त्र उद्योगासंबंधी वस्तू कायदेशीरपणे साठविण्याचा व्यवसाय करत होती व त्या प्रमाणे भारत सरकाने उद्यम दाखला तिला दिला आहे दिनांक १४/६/२०२५ रोजी सदर वेअरहाऊस मध्ये अकस्मात आग लागून अनपेक्षित स्फोट झाला आणि त्या आगीत एक इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटना ही पूर्णतः अकस्मात असून कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी दुर्भावना किंवा हेतू यात नव्हता. यामध्ये मुख्यतः आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांचा व जिल्हा प्रशासनाचा हलगर्जीपणा स्पष्ट पणे कारणीभूत आहे, कारण आपत्ती व्यवस्थाप कायदा-२००५ च्या कलम ५५ नुसार जिल्हाधिकारी यांनी व्याख्या २ मध्ये नमूद असलेल्या सुरक्षा उपकरणांचे आयोजन, नियोजन, संयोजन व अंमलबजावणी करणे बाबत कोणतेही प्रतिबंधात्मक अथवा सुरक्षा विषयक आदेश पारित केलेले नाहीत प्रत्यक्ष सुरक्षा उपाययोजना (fire protection systems) सरकारने अधिसूचित केल्या असून त्या लागू करणाऱ्याची देखील जबाबदारी स्थानिक प्रशासनावर असते व त्याची अंमलबजावणी केली गेली नाही, हे दुर्घटनेचे मुख्य कारण आहे पोलीस प्रशासनाने सदर प्रकरणात कलम १०५ लावून, हे प्रकरण जामीन अयोग्य ठरावे असा हेतू पुरस्सर प्रयत्न केला आहे.६.वस्तुत: सदर घटनेसाठी कलम १०६ हे अधिक योग्य असून ते जामीनपात्र आहे व ते लावले पाहिजे असे अवगत असताना ते लावले नाही, सदरकामी कलम १०५ प्रमाणे गुन्हा घडलेला नसताना, त्या कलमा खाली गुन्हा नोंदविणे आरोपी अटक करून आरोपीस प्रथम वर्ग न्याय दंडाघिकरी यांचे समोर हजर करून,पोलीस कोठडी घेणे ही बाब बेकायदेशीर आहे व तो घटनात्मक हक्काचा भंग ठरला आहे इतकच नाही तर पोलिसांचा उद्देश स्पष्ट आहे त्यांनी पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून, जाणीवपूर्वक कठोर कलम लावले आहे, जेणेकरून अर्जदारास तुरुंगात ठेवता येईल व जामीन नाकारता येईल अर्जदार महिला ही वयाची असून तिची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. ती एक प्रतिष्ठित नागरिक असून, सहकार्य करण्यास तयार आहे. तिच्याकडून पुरावे नष्ट होण्याचा किंवा फरार होण्याचा कोणताही धोका नाही अशा परिस्थितीत, मा.न्यायालयास विनंती आहे की पोलिसांचा हेतुपुरस्सर व अन्यायकारक कलमांचा वापर लक्षात घेऊन, अर्जदारास अटकपूर्व जामीन मंजूर करावा असा जोरदार व्यक्तीवाद ॲड विकास पाटील शिरगावकर यांच्याकडून करण्यात आला असल्याचे पाहायला मिळाले.