पुणे हडपसर सय्यद नगर परिसर हदरला API कृष्णा बाबर यांच्या टीमची दादागिरी सामाजिक कार्यात दिसणारा टिपू पठान नेता झाला का म्हणत घराची ऑफिसची पोलिसांकडून तोडफोड पुन्हा सामाजिक कार्यात दिसल्यास खोटे गुन्हे दाखल करून मोका लावू एपीआय कृष्णा बाबर यांची घरी येऊन परिवाराला दमदाटी,
पुणे प्रतिनिधी
हडपसर सय्यद नगर परिसरामध्ये रिजवान (उर्फ) टिपू पठाण याच्या वरती मागील कार्य काळामध्ये अनेक गुन्हे दाखल होते व त्यानुसार त्याला कारावास देखील झाला होता परंतु टिपू पठाण यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे मागील एक दोन वर्षापासून त्यांच्या सामाजिक कार्याचा ओघ वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे व रिजवान (उर्फ) टिपू पठाण हा वारंवार सामाजिक कार्यामध्ये अग्रेसिव असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, परंतु आता त्याच्या या सामाजिक कार्याला पोलिसांचे ग्रहण लागले आहे की काय? असा देखील असणारा प्रश्न उपस्थित झाला आहे, याचे कारण म्हणजे पुणे क्राईम ब्रँच युनिट 5 चे API कृष्णा बाबर कॉन्स्टेबल अमित कांबळे राजू शेख यांनी रात्री अचानक टिपू पठाण यांच्या घरी धाड टाकली व एपीआय कृष्णा बाबर त्यांच्या परिवारास म्हणाले कुठे आहे टिपू पठाण तो या भागातील नेता बनतो की काय त्याला कळत नाही का मला भेटायला यायला तर राजू शेख म्हणाले मी मागील दिवसांपासून पाहतोय टिपू पठाण हा विविध सामाजिक कार्यामध्ये दिसत आहे त्याला हे माहित नाही का तो या भागातील गुन्हेगार आहे, व त्याने सामाजिक कार्यामध्ये अजिबात माझा चहापाणी केल्याशिवाय दिसायचं नाही पहीलं आम्हाला येऊन भेटायच नंतरनच त्याला म्हणावं सामाजिक कार्यात दिस तर कॉन्स्टेबल अमित कांबळे म्हणाले टिपू पठाण ला सांगा आम्ही येऊन गेलो गेल्या वेळेस आलो तेव्हा त्याची गाडी फोडली होती तेव्हाही तो आम्हाला भेटायला आला नाही तर एपीआय कृष्णा बाबर म्हणाले आताही त्याला एक दणका द्या असे म्हणताच टिपू पठाण यांच्या भावाच्या नावे असणाऱ्या ऑफिसची पोलिसांकडून तोडफोड करण्यास पुणे क्राईम ब्रँच युनिट 5/ चे कॉन्स्टेबल अमित कांबळे राजू शेख यांच्यासह त्यांच्या संपूर्ण टीमने सुरुवात केली व घरातील महिलांना लहान मुलांना दमदाटी केली तेथील उभे असणाऱ्या युवकांना मारहाण देखील केली आणि या परिसरातील आत्ताच्या क्षणाला सगळ्यात मोठा गुंड हा पोलीस आहे हे टिपू पठाण याला सांगा आणि मला भेटायला पाठवा असे म्हणत पुणे क्राईम ब्रँच युनिट 5/ चे एपीआय कृष्णा बाबर यांनी आपल्या खाकी वर्दीची दहशत दाखवत लहान मुलांच्या वैचारिक जीवनावरती खाकी वर्दीचा द्वेष निर्माण होईल असे कृत्य केले असल्याने परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे व या परिसरात पुणे क्राईम ब्रँच युनिट 5 चे कृष्णा बाबर व त्यांच्या टीम विषयी पोलिसांविषयी लोकांचे नाराजीचे मत असल्याचे दिसून येत आहे, तर मात्र दहशत वाजवणाऱ्या पोलिसांन वरती पुणे शहराचे नवीन पोलीस आयुक्त तात्काळ निलंबनाची कारवाई करणार का? हे पाहणं गांभीर्याचे ठरणार आहे,

