प्रतिनिधी अनमोल कांबळ
महाबळेश्वरच्या तत्कालीन तहसीलदार तेजस्विनी कोचरे पाटील यांनी अनाधिकृत बांधकामांवरती केलेल्या कारवाया योग्य की अयोग्य भोसे येथील कारवाई झालेल्या बांधकामांची कामे पुन्हा नव्याने सुरू नवनिर्वाचित तहसीलदार मस्के यांच्यासह गाव कामगार तलाठी यांची मात्र बघ्याची भूमिका..
मौजे भोसे येथील अनधिकृत बांधकामावरती कारवाईचा बडगा उभरात महाबळेश्वर तालुक्याच्या तत्कालीन तहसीलदार तेजस्विनी खोचरे पाटील यांनी महाबळेश्वर शहराच्या आजूबाजूंच्या काही ठराविक गावांमध्ये अनाधिकृत बांधकामे उध्वस्त करण्याच्या माध्यमातून कारवाईचा तडाका लावला होता मात्र तहसीलदार तेजस्विनी खोचरे पाटील यांची महाबळेश्वर तालुक्यातून बदली होताच हा सर्व कारभार नवनिर्वाचित तहसीलदार मस्के यांच्या हातामध्ये गेला तेजस्विनी कोचरे पाटील यांच्या कारभाराविरुद्ध महसूल आयुक्त पुणे महसूल मुख्य सचिव मुंबई मंत्रालय यांच्याकडे अनेक तक्रारी दाखल असल्यानेच तत्कालीन तहसीलदार तेजस्विनी कोचरे पाटील यांना प्रमोशन न मिळाल्याची देखील चर्चा सुरू आहे तत्कालीन तहसीलदार तेजस्विनी कोचरे पाटील यांनी मौजे भोसे येथील जी अनाधिकृत बांधकामे उध्वस्त केली तीच अनाधिकृत बांधकामे महाबळेश्वर तालुक्याचे नवनिर्वाचित तहसीलदार मस्के यांनी पुन्हा नव्याने सुरू केली आहेत की काय? असा असणारा प्रश्न उपस्थित झाला आहे भोसे येथील छेडा बिल्डरचा असणारा अनधिकृत बंगला हा तत्कालीन तहसीलदार यांनी कारवाईचा बडगा उभारत उध्वस्त केला होता मात्र नवनिर्वाचित तहसीलदार मस्के यांच्या कार्य काळामध्ये याच बंगल्याचे नव्याने काम सुरू झाले असल्याने नक्की छेडा बिल्डरला आशीर्वाद कोणाचा असा असणारा प्रश्न उपस्थित झाला आहे या संदर्भात भोसे गावचे पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधला असल्याने मिळालेली माहिती अशी आहे की गाव कामगार तलाठी मोहिते यांना वारंवार पोलीस पाटील यांनी तोंडी सांगितले होते की सदर ठिकाणचे गावाकडे जाणाऱ्या मुख्य रोडवरील अनधिकृत बांधकाम नव्याने सुरू होत आहे परंतु गाव कामगार तलाठी मोहिते यांनी या कामाकडे अक्षरशः दुर्लक्ष करत ठीक आहे म्हणत पाहून घेऊ ही भूमिका ठेवत अनाधिकृत बांधकाम उभारणाऱ्या छेडा बिल्डरला आपला पाठिंबाच दर्शवला असल्याचे समोर आले आहे, गाव कामगार तलाठी मोहिते यांनी भोसे हद्दीमध्ये अनेक आपल्या कार्यकाळामध्ये अनाधिकृत बांधकामांना आपला पाठिंबा दर्शवल्याचे समोर आले असून याचच बक्षीस म्हणून मोहिते यांना आता नव्याने पाचगणी शहराचा देखील चार्ज अर्पण झाला असल्याचे समोर आले आहे, प्रशासनाला आपल्या मर्जीनुसार चालवणाऱ्या व वेळ मिळाल्यास अनाधिकृत बांधकामाचा पंचनामा करणाऱ्या तसेच छेडा बिल्डरच्या अनाधिकृत बंगल्याला आपला पाठिंबा दर्शवणाऱ्या गाव कामगार तलाठी मोहिते यांच्यावरती कारवाई कधी होणार का? हे बघणे गांभीर्याचे ठरणार आहे.

