स्वप्निल भाई गायकवाड यांच्या नेतृत्वा समवेत निघालेला लॉंग मार्च अखेर आंदोलकांनी प्रशासनाच्या अंतयात्रेपर्यंत पोहचवला.!



प्रतिनिधी अनमोल कांबळे

स्वप्निल भाई गायकवाड यांच्या नेतृत्वा समवेत निघालेला लॉंग मार्च अखेर आंदोलकांनी प्रशासनाच्या अंतयात्रेपर्यंत पोहचवला.!

वाई तालुक्यातील कुसगाव या ठिकाणी सुरू असणाऱ्या बेकायदेशीर क्रशरविरोधात स्वप्निल भाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पाच गावातील गावकऱ्यांनी क्रशर बंद करण्याकरिता मंत्रालयाच्या दिशेने काढलेला लॉंग मार्च 210 किलोमीटरच्या पायी प्रवासानंतर पनवेल या ठिकाणी पोचला असून आता मात्र आंदोलकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे नेते स्वप्निल भाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची दिशा बदलत आंदोलकांनी प्रशासनाच्या ढसाळ कारभाराची अंत्ययात्राच काढल्याने राज्यभर खळबळ उडाली असून जिल्हाधिकाऱ्यांच्या एकतर्फी धोरणाचे चित्र सर्वत्र प्रसिद्ध झाले असल्याचे पाहायला मिळत आहेत, एक क्रशर ज्याला ग्रामपंचायतीची परवानगी नाही ज्याला कायदेशीर वनविभागाची परवानगी नाही असा बेकायदेशीर क्रशर 210 किलोमीटरचा पायी प्रवास केल्यानंतरही कुणाच्या अठाहसासाठी उभारला जात आहे, असा संतप्त सवाल आंदोलकांचे नेते स्वप्निल भाई गायकवाड यांनी प्रशासनाला केला आहे, पुढे जाऊन स्वप्निल गायकवाड म्हणाले ही लढाई आम्ही शेवटपर्यंत चालू ठेवत मुख्यमंत्र्यांच्या दारामध्ये नेणार आहोत, भूमिपुत्रापेक्षा क्रेशर महत्त्वाचा आहे का ? असा देखील सवाल स्वप्निल भाई गायकवाड यांनी यावेळेस प्रशासनाला केला असल्याने आता मुख्यमंत्री दाराच्या वेशीवरती आलेल्या आंदोलकांच्या भावना समजून निर्णय घेणार का? हे बघणे गांभीर्याचे ठरणार आहे.