सातारा प्रतिनिधी
मौजे भिलार येथील सर्वे नंबर ९/२४. मध्ये पर्यावरणाचे व इको सेन्सिटिव्ह झोनचे नियम डावलुन आपल्या पदाचा गैरवापर करत व स्थानिक अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेकायदेशीर खोदकाम करून उभारलेला आलिशान राजवाडा हा वाई प्रांताधिकारी जाधव यांनी संजय मोहन कांबळे यांना स्वखर्चाने काढून घेण्याचे आदेश दिलेले आहेत, या आदेशामुळे तक्रारदार अनमोल कांबळे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, अधिकारी हा कशाप्रकारे मॅनेज होऊ शकतो हे या प्रकरणांमध्ये दिसत आहे. पंचनामा केला परंतु केवळ उत्खनन केलेला किरकोळ पंचनामा केला उभारलेल्या राजवाड्याचा पंचनामा केला परंतु खोदलेल्या विहिरीचा पंचनामा का करण्यात आला नाही ? ही फार मोठी एका पोलीस अधिकाऱ्यांने महसुलातील शासकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या दमाची दहशत आहे की काय ? अशी चर्चा आता चालू झालेली आहे, जर का तुम्ही पंचनामा करता तर त्या राजवाड्या शेजारी खोदलेल्या विहिरीचा पंचनामा का तलाठी सर्कल यांनी केला नाही ? म्हणजे पाणी नक्की कुठे मुरत होते इथूनच या विषयाची सुरुवात होती इतकंच काय तर प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्खनन करून देखील तिथे कार्यरत असणाऱ्या तलाठ्यांनी उत्खनाचा पंचनामा हा केवळ किरकोळ रित्या केलेला होता, आणि हजारो लाखो ब्रास उत्खनन हे संबंधिताने केलेले झाकण्याचे काम तिथे असणाऱ्या तलाठी आणि सर्कल यांनी केलं, परंतु हा निकाल हा निकाल नसून ही चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विजयाची निशाणी आहे, आंदोलनाला मिळालेल्या यशाचे प्रतीक आहे, आता फक्त वाट एकाच गोष्टीची बघावी लागणार आहे, बेकायदेशीर राजवाड्यावरती महसूल विभाग कारवाई कधी करणार आणि कारवाई होत नसल्यास संघर्ष उभा करावा लागणार आहे, पण येणारा संघर्ष हा विजयाचा टिळक आम्हाला लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, इतकंच कायतर मौजे भिलार येथील ग्रामपंचायत सदस्यत्व आरक्षित जागेवरती सर्वसामान्य कार्यकर्त्याला नाकारून पदाच्या आणि पैशाच्या ताकती वरती पद प्रतिष्ठा ही माझ्याच घरांमध्ये नादली पाहिजे, हे धोरण राबवून सर्वसामान्य कार्यकर्तेचे हक्क हिरावून घेऊन भिलार ग्रामपंचायत सदस्यत्व पद देखील आपल्याच घरामध्ये संबंधितांनी ठेवलेल आहे, आणि म्हणून या आदेशामुळे आता लवकरच कार्यकर्त्याला डावलून पैशाच्या आणि पदाच्या ताकती वरती सदस्यत्व पद हे आपल्या घरामध्ये ठेवलेलं पद आता जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही तक्रार करून लवकरात लवकर रद्द करु व तिथे असणाऱ्या सर्वसामान्य इच्छुक उमेदवाराला न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे अनमोल कांबळे यांनी सांगितले,

