साहिल वाकोडे मृत्यु प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जी कवाडे यांची IIT मुंबई येथे भेट.

साहिल वाकोडे मृत्यु प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जी कवाडे यांची IIT मुंबई येथे भेट.

September 26, 2026 | महाराष्ट्र

प्रतिनिधी मुंबई

साहिल वाकोडे मृत्यु प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जी कवाडे यांची IIT मुंबई येथे भेट.

IIT मुंबई पवई येथील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जी कवाडे यांनी आज IIT मुंबई येथे भेट दिली या भेटीदरम्यान जयदीप कवाडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकरणातील घटनाक्रम आणि आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती घेतली तसेच साहिल वाकोडे यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या व भूमिका जाणून घेतल्या.

प्रकरणाची वस्तुनिष्ठ माहिती समोर यावी यासाठी निष्पक्ष आणि सखोल चौकशीची आवश्यकता असल्याचे कवाडे यांनी यावेळी सांगितले. तपासादरम्यान उपलब्ध असलेले CCTV फुटेज, डिजिटल पुरावे आणि संबंधित व्यक्तींची विधाने यांचा तपास करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात यावी, अशी भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली तपासातून कोणतीही कायदेशीर जबाबदारी निश्चित झाल्यास त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात यावी, असेही जयदीपभाई कवाडे यांनी सांगितले या प्रकरणात तपास यंत्रणांकडून वस्तुनिष्ठ चौकशी होऊन सत्य परिस्थिती समोर यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केले यावेळी प्रदेश संघटक कपिल लिंगायत, मुंबई युवा आघाडी अध्यक्ष विनोद घेगडे मुंबई महिला आघाडी अध्यक्ष ॲड. सुजन विल्सन, इशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष विशाल कोकाटे विक्रोळी विभाग प्रमुख रॉबिन ॲलिस विल्सन एलिस,महिला आघाडीच्या नेत्या रेशमा दामोदर युवा नेते प्रवेश ठावरे ठाणे शहर युवक आघाडी अध्यक्ष श्रेयस साळुंखे, पवई विभागाचे नेते डी. डी. वाघमारे, पी. आर. पी झोपडपट्टी सेल चे मुंबई अध्यक्ष बाबू सुपरे, रॉयल दामोदर यांच्यासह भीमसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र

Related Posts

पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष लघुउद्योग महामंडळाचे अध्यक्ष राज्यमंत्री जयदीप जी कवाडे यांचा वाढदिवस मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये उत्साहात साजरा कार्यकर्त्यांसह नेत्यांच्याही शुभेच्छा महासभेला संबोधित ही केले.

September 26, 2026

पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष लघुउद्योग महामंडळाचे अध्यक्ष राज्यमंत्री जयदीप जी कवाडे यांचा वाढदिवस मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये उत्साहात…