पाकिस्तानचे हस्तक पाचगणी पर्यंत पाचगणी येथील प्रकार सर्वे नंबर 128/ मध्ये न्यू वेरा शाळा करती तरी काय? शाळेचा पैसा भारत विरोधी कारवाया करण्याकरिता दहशतवाद्यांच्या खिशात जातोय की काय? आदित्य गायकवाड अनमोल कांबळे यांचा जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षकांना सवाल.
प्रतिनिधी पांचगणी
देशभरात शैक्षणिक स्थळ म्हणून ओळखले जाणाऱ्या पाचगणी येथील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे चक्क शासनाच्या वेबसाईट वरती पाकिस्तान नावाने सातबारा उपलब्ध झाला असल्याने तो सातबारा नक्की कुठला याचा शोध घेतला असता पाचगणी येथील तारे जमीनपर या पिक्चर मध्ये दाखवलेले न्यू एरा हायस्कूल या शाळेचा असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, नक्की शाळा भारताची की पाकिस्तानच्या हस्तकांची असा देखील असणारा प्रश्न उपस्थित झाला असल्याचे दिसून येत आहे, या संदर्भात ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड व अनमोल कांबळे यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेऊन कारवाई करण्याकरिता निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून शाळेचा पैसा नक्की जातोय तरी कुठे याची सखोल चौकशी करा पाकिस्तानी हे नाव आपल्या शाळेच्या सातबार्या वरती टाकणाऱ्या संस्था चालकांवरती देशाविरुद्ध दहशतवादी कृत करणाऱ्या या वृत्ती वरती देशद्रोहाचे खटले दाखल करा महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वरती पाकिस्तान नावाचा असणारा सातबारा त्वरित रद्द करा व असे न झाल्यास येत्या 15 ऑगस्ट दिवशी जो कार्यकर्ता ज्या ठिकाणी उभा असेल तो कार्यकर्ता त्या ठिकाणी पाचगणी येथील न्यू एरा शाळेचा पाकिस्तान नावाचा असणारा सातबारा फाडून आपला निषेध नोंदवेल याची दक्षता प्रशासनाने व शासनाने घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे, तर जिल्हाधिकारी यांनी येत्या आठ दिवसांमध्ये कारवाई करू असे निवेदन करत्यांना आश्वासन दिले आहे,

