प्रतिनिधी अनमोल कांबळे
प्रशासनाची मोठी जबाबदारी मुख्याधिकारी निखिल जाधव यांकडे आत्ता फलटण नगर परिषदेचा कारभार.
फलटण नगर परिषदेचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी म्हणून निखिल जाधव यांच्याकडे फलटण नगर परिषदेची जबाबदारी प्रशासनाने सोपवली असून आता फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे निखिल जाधव असणार आहेत निखिल जाधव यांचा आजपर्यंतचा प्रशासनातील कारभार हा अत्यंत कठोर भूमिका घेणारा कारभार ठरला असून लोकहितार्थ निर्णय निखिल जाधव यांच्या कार्यकाळात झाले असल्याचे कुकुरवाड नगरपालिके सह पाचगणी नगरपालिकेत देखील पाहायला मिळाले आहे, नगरसेवकांचा मनमानी कारभार वारंवार राजकारण्यांच्या आशीर्वादाने प्रशासनाला वेटीस धरणाऱ्यांचा मनमानी कारभार त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये हाणून पाडला असल्याचे आजपर्यंत पाहायला मिळाले आहे, निखिल जाधव यांच्या प्रखर निर्णयामुळे ज्या ज्या ठिकाणी निखिल जाधव यांनी कर्तव्य बजावले आहे त्यात्या ठिकाणी लोकहितार्थ विकास देखील झाला असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे, याच कर्तव्याचा दाखला म्हणून मुख्याधिकारी निखिल जाधव यांची आता फलटण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी प्रशासनाने नियुक्ती केल्याने फलटण शहराच्या विकासाला नगरपरिषदेच्या माध्यमातून नवी दिशा मिळणार का? हे बघणे गांभीर्याचे ठरणार आहे.

