खंडाळा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा आदित्य गायकवाड आशिष मोरे सिद्धनाथ गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये ऑल इंडिया पॅंथर सेनेत जाहीर प्रवेश.



प्रतिनिधी शिरवळ

खंडाळा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा आदित्य गायकवाड आशिष मोरे सिद्धनाथ गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये ऑल इंडिया पॅंथर सेनेत जाहीर प्रवेश….

खंडाळा शिरवळ येथील वंचित बहुजन आघाडी मध्ये कार्यरत असणाऱ्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा ऑल इंडिया पॅंथर सेनेमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला आहे या प्रवेशा दरम्यान आदित्य गायकवाड अनमोल कांबळे आशिष मोरे सिद्धार्थ गायकवाड उपस्थित होते यावेळी प्रवेश करणाऱ्या आजी माझी पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत असताना सांगितले जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांना अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याकरिता बळ मिळणार आहे, हा विश्वास आमच्यामध्ये आहे, तर जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड म्हणाले ऑल इंडिया पॅंथर सेना ही संघटना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या नेतृत्वांमध्ये अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारी एक संघटना आहे ही संघटना विद्रोहाचा विस्फोट करणारी संघटना आहे, आणि या संघटनेमध्ये अन्याय अत्याचारा विरुद्ध वाचा फोडणाऱ्या विद्रोही कार्यकर्त्यांनी सामील व्हावे आणि इथ असणाऱ्या प्रस्थापित गोरगरीब वंचित पीडित शोषित तांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा तुम्ही हाक द्या आम्ही तुम्हाला साथ दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हा विश्वास आम्ही तुम्हाला देतो यावेळी मान्यवरांनी भाषणान मधून कार्यकर्त्यांना यावेळी धीर देण्याचा प्रयत्न केला त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून आले आहे.