कर्ज माफीचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करा जयदीप कवाडे यांची निवेदनाद्वारे शिष्टमंडळासह कृषिमंत्र्यांकडे मागणी कृषिमंत्र्यांचे सकारात्मक उत्तर.!



प्रतिनिधी मुंबई

कर्ज माफीचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करा जयदीप कवाडे यांची निवेदनाद्वारे शिष्टमंडळासह कृषिमंत्र्यांकडे मागणी कृषिमंत्र्यांचे सकारात्मक उत्तर.

पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र शासन लघुउद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष राज्यमंत्री जयदीप कवाडे यांनी शिष्टमंडळासह कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांची भेट घेतली या भेटीनंतर जयदीप कवाडे यांनी कृषी मंत्री यांना निवेदन सादर करत राज्यभरात कर्जमाफीची घोषणा सरकारने केली असून या घोषणेनंतर तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे वर्ग करा अशा आशयाचे निवेदन कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना सादर केले आहे या निवेदनानंतर कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी सांगितले शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वर्ग करण्याचा प्रस्ताव विभागांना पाठवण्यात आला असून येत्या सोमवार पासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वर्ग करण्यास सुरुवात होईल असा शब्द राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांना दिला आहे.