जेव्हा महाराष्ट्रातील एखादी व्यक्ती हिंदुस्थानची सरन्यायाधीश बनते आणि पहिल्यांदा महाराष्ट्राला भेट देते त्यावेळेस जर का महाराष्ट्राचे मुख्य सचिव पोलीस महासंचालक किंवा मुंबई पोलीस आयुक्त यांना त्यांच्या स्वागताला उपस्थित राहण्याचे योग्य वाटत नसेल तर त्यांनी विचार करणे गरजेचे आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी बोलून दाखवली खंत..!



जेव्हा महाराष्ट्रातील एखादी व्यक्ती हिंदुस्थानची सरन्यायाधीश बनते आणि पहिल्यांदा महाराष्ट्राला भेट देते त्यावेळेस जर का महाराष्ट्राचे मुख्य सचिव पोलीस महासंचालक किंवा मुंबई पोलीस आयुक्त यांना त्यांच्या स्वागताला उपस्थित राहण्याचे योग्य वाटत नसेल तर त्यांनी विचार करणे गरजेचे आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी बोलून दाखवली खंत.

प्रतिनिधी अनमोल कांबळे

देशाच्या सरन्यायाधीशांनी मुंबईतील एका कार्यक्रमांमध्ये खंत व्यक्त केल्यानंतर सर्वत्र या गोष्टीची चर्चा सुरू झाली असून महाराष्ट्राचे मुख्य सचिव पोलीस महासंचालक व मुंबई पोलीस आयुक्त यांच्यावरती चहूबाजूने टीका होत असल्याचे दिसून आले आहे, देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायाधीश पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्र मुंबईमध्ये आले होते मुंबई मध्ये आले असता त्यांच्या स्वागताला प्रोटोकॉल नुसार महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव पोलीस महासंचालक किंवा मुंबई पोलीस आयुक्त यांनी त्यांच्या स्वागताकरिता उपस्थित राहणे बंधनकारक होते परंतु देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई हे मुंबईत आले असता महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल पाळला नसल्याचे यावेळी दिसून आले असून स्वतः देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी देखील या गोष्टीची खंत बोलून दाखवली असल्याचे दिसून आले आहे याच गोष्टीवरती टिप्पणी करत सातारा जिल्ह्याचे जेष्ठ वकील ॲड विकास पाटील शिरगावकर म्हणाले देशाच्या सरन्यायाधीशांच्या शपथ समारंभा मध्ये देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान, विरोधी पक्ष नेते, मंत्रीमंडळ उपस्थित राहतात मात्र मुंबई येथे डीजीपी सीपी हे गैरहजर राहतात, हा सर्वोच्च न्यायालायाचा व त्याचे प्रमुख न्यायमूर्ती यांचा तसेच देशाचाच अपमान आहे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई होणे गरजेचे असल्याचे ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी सांगितले व ॲड डॉ अन्वर हुसेन म्हणाले संविधानिक दृष्ट्या देशाच्या संविधानाने दिलेला अधिकाराचा हा आव्हान या महाराष्ट्र राज्यातीलअधिकाऱ्यांनी करून दाखवला आहे, या गोष्टीमुळे राज्याची मान झुकली गेली असल्याचे ॲड डॉ अन्वर हुसेन यांनी सांगितले असल्याने चहूबाजूने देशाच्या सरन्यायाधीशांच्या स्वागताला गैरहजर राहणाऱ्या महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांवरती चौहू बाजूने टीका होत असून या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार का ? हे बघणे गांभीर्याचे ठरणार आहे.